आष्टी तालुक्यातील ई पीक पाहणीची ऑनलाईन नोंद करावी - तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:27 AM2021-01-15T04:27:43+5:302021-01-15T04:27:43+5:30

सध्या सर्वच ठिकाणी ऑनलाईनद्वारे कामे होत असून व त्यामुळे कामात पारदर्शकता येत आहे. तसेच ऑनलाईनसाठी तलाठी व कृषी कार्यालयात ...

E-crop survey in Ashti taluka should be registered online - Tehsildar | आष्टी तालुक्यातील ई पीक पाहणीची ऑनलाईन नोंद करावी - तहसीलदार

आष्टी तालुक्यातील ई पीक पाहणीची ऑनलाईन नोंद करावी - तहसीलदार

Next

सध्या सर्वच ठिकाणी ऑनलाईनद्वारे कामे होत असून व त्यामुळे कामात पारदर्शकता येत आहे. तसेच ऑनलाईनसाठी तलाठी व कृषी कार्यालयात सर्वसामान्य शेतक-यांना हेलपाटे मारण्याची यामुळे गरज भासणार नाही. त्यामुळे प्रत्येक गावातील स्वस्त धान्य दुकान,महा ई सेवा केंद्र चालक,पोलिस पाटील, कोतवाल ज्यांना स्मार्ट फोन हातळण्याचे कौशल्य आहेत यांनी पुढे येऊन गावक-यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंदणी करण्यास मदत करावी, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आवाहन केले. आष्टी तालुक्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदारांनी स्वतः अगर स्मार्ट फोन वापरण्याचे कौशल्य असणारा मुलगा यांनी किमान दररोज २५ शेतकऱ्यांचे ई पीक पाहणीची नोंद अपलोड करायची आहेत. तरी १४ जानेवारीपासून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आवाहन तहसिलदार शारदा दळवी यांनी केले आहे.

Web Title: E-crop survey in Ashti taluka should be registered online - Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.