बीडमधील ७ परिमंडळात पहाटे झाली अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 05:05 PM2017-09-08T17:05:05+5:302017-09-08T17:08:24+5:30

जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. आष्टी, पाटोदा व बीड तालुक्यातील ७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे बंधा-यांसह अनेक ठिकाणचे तलावही ओव्हरफ्लो झाले आहेत.

early morning heavy rainfall in 7 Circles of Beed | बीडमधील ७ परिमंडळात पहाटे झाली अतिवृष्टी

बीडमधील ७ परिमंडळात पहाटे झाली अतिवृष्टी

googlenewsNext

बीड : जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. आष्टी, पाटोदा व बीड तालुक्यातील ७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे बंधा-यांसह अनेक ठिकाणचे तलावही ओव्हरफ्लो झाले आहेत. 

जिल्ह्यात बीड, नाळवंडी, लिंबागणेश, पाटोदा, थेरला, दासखेडा, आष्टी या सात महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मागील २४ तासांत ३६.९७ मि.मी. पावसाची नोंद  झाली असून, आतापर्यंत सरासरी ५०४.५६ मि.मी. एवढा पाऊस झाला आहे. या पावसामुळे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाले असून, नदीला पूर आला आहे.

वीज पडून तीन बैल ठार
बीड तालुक्यातील नेकनूरपासून जवळच असलेल्या भंडारवाडी येथे  वीज पडून कैलास सलुगडे या शेतक-याचे तीन बैल जागीच ठार झाले, तर एक बैल गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यामध्ये त्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
 

Web Title: early morning heavy rainfall in 7 Circles of Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.