कडा गट ही माझी कर्मभूमी, विकासात झुकते माप देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:32 AM2021-02-13T04:32:24+5:302021-02-13T04:32:24+5:30
आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात कडा शहर व कडा गटातून झालेली आहे. कडा शहर हे नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे ...
आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात कडा शहर व कडा गटातून झालेली आहे. कडा शहर हे नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे म्हणूनच आज मी राजकारणात इथपर्यंत यश मिळवू शकलो आहे. त्यामुळे कडा शहर व कडा गटातील विकासकामांना आपण नेहमीच झुकते माप देऊ, असे आश्वासन आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिले.
कडा येथे विविध विकासकामांचा शुभारंभ ११ फेबुवारी रोजी करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना कडा ग्रामस्थांना दिले.
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार
बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते आष्टी तालुक्यातील कडा गटातील १ कोटी १५ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ ११ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, डॉ. शिवाजी राऊत, सुनील नाथ, हरिभाऊ दहातोंडे, संदीप सुम्बरे, भाऊसाहेब घुले, अशोक पोकळे, महेश आजबे, श्रीरंग आप्पा कर्डिले, संग्राम आजबे, जगन्नाथ ढोबळे, डॉ. सुनील गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सरपंच रामदास उदमले, सतीश सोले, राजू जरांगे, बबन काळे, अतुल शिंदे, राहुल जेवे, शरद औटे, सचिन गाडे, गणेश सरोदे, कैलास आजबे, बाळासाहेब कर्डिले, राम कर्डिले, बाबा कर्डिले, बाळासाहेब इंगोले, सोमा कर्डिले यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.