शिक्षण आणि संघर्ष हाच विद्यापीठाचा मूलाधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:38 AM2021-08-25T04:38:12+5:302021-08-25T04:38:12+5:30

मोहम्मद इलियास : गढी महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिन लोकमत न्युज गेवराई : शिक्षण आणि संघर्ष ज्यांच्या जीवनाचा मूलाधार ...

Education and struggle are the foundation of the university | शिक्षण आणि संघर्ष हाच विद्यापीठाचा मूलाधार

शिक्षण आणि संघर्ष हाच विद्यापीठाचा मूलाधार

googlenewsNext

मोहम्मद इलियास : गढी महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिन

लोकमत न्युज

गेवराई : शिक्षण आणि संघर्ष ज्यांच्या जीवनाचा मूलाधार आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. आज या विद्यापीठाचा ६३ वा वर्धापन दिन साजरा करताना डॉ. आंबेडकर यांची हीच जीवननिष्ठा शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात नवनिर्माणासाठी आपल्या सर्वांना खरी प्रेरणा ठरते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मोहम्मद इलियास यांनी केले.

तालुक्यातील गढी येथील जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला व विज्ञान महाविद्यालयात सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विश्वास कदम यांनी विद्यापीठाचा गेल्या ६३ वर्षातील विस्तार मांडून सामाजिक मूल्यांच्या प्रचार, प्रसारात विद्यापीठाने मोलाची भर घातल्याचे सांगितले. प्रास्तविक प्रा. धर्मराज कटके यांनी केले. प्रा. रमेश रिंगणे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. अयोध्या पवळ यांनी केले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

230821\5014img-20210823-wa0191_14.jpg

Web Title: Education and struggle are the foundation of the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.