अंबाजोगाईत डीवायएफआय-एसएफआयचे शिक्षण, रोजगाराच्या प्रश्‍नावर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:23 AM2021-07-10T04:23:36+5:302021-07-10T04:23:36+5:30

राज्यभरात विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून आज अंबाजोगाई येथे एसएफआय व डीवायएफआयच्या ...

Education of DYFI-SFI in Ambajogai, agitation on the question of employment | अंबाजोगाईत डीवायएफआय-एसएफआयचे शिक्षण, रोजगाराच्या प्रश्‍नावर आंदोलन

अंबाजोगाईत डीवायएफआय-एसएफआयचे शिक्षण, रोजगाराच्या प्रश्‍नावर आंदोलन

googlenewsNext

राज्यभरात विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून आज अंबाजोगाई येथे एसएफआय व डीवायएफआयच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन राज्य व केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

आंदोलनाच्या मागण्या

स्वप्निल लोणकर याच्या कुटुंबीयांना शासनाने योग्य ती मदत करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व एमपीएससी परीक्षांची पूर्तता करावी. तसेच शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागांवर ३१ जुलैपर्यंत भरती झाली पाहिजे, सरकारी विभागातील सर्व भरत्या एमपीएससीच्या माध्यमातून कराव्यात, शासकीय विभागातील भरतीसाठी महापोर्टल बंद करावे, सरकारी विभागासाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेची खासगी एजन्सींना आऊटसोर्सिंग बंद करावी. कारण खासगी एजन्सीमार्फत भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व अचूकता नसते, विविध सरकारी विभागांमधील सर्व रिक्त जागा घोषित कराव्यात, भरती प्रक्रिया पुरेशा पारदर्शकतेने पूर्ण झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढून टाकणाऱ्या खासगी शाळांचा परवाना सरकारने रद्द करावा, खासगी शाळांमध्ये ५०% फी कमी करावी. हे नोंद घेण्यासारखे आहे की, वर्ग ऑनलाईन घेण्यात आल्यामुळे गेल्या वर्षी शाळांचा ऑपरेटिंग खर्च बराच घटला आहे, आरटीई प्रवेश योग्य प्रकारे होत आहेत, याची खातरजमा सरकारने केली पाहिजे, आरटीई प्रवेशामुळे खासगी शाळांना फीच्या रकमेचा अनुशेष सरकारने तातडीने दिला पाहिजे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी डीवायएफआयचे जिल्हा कमिटी सदस्य कॉ. देविदास जाधव, कॉ. प्रशांत मस्के, कॉ. ॲड. महेश देशमुख, डॉ. विनायक गाडेकर, एसएफआयचे अशोक शेरकर, जगन्नाथ पाटोळे, सचिन टिळक, अभिमन्यू माने इत्यादी उपस्थित होते.

090721\img-20210709-wa0041.jpg

विध्यार्थ्यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले

Web Title: Education of DYFI-SFI in Ambajogai, agitation on the question of employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.