शिक्षण ‘एमएस्सी’... पण, नोकरदाराऐवजी बनला दुचाकीचोर; खर्चासाठी निवडला चुकीचा रस्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:22 PM2019-02-06T12:22:59+5:302019-02-06T12:25:36+5:30

उच्चशिक्षित असतानाही परिस्थिती आणि जादा पैशांच्या लालसेपोटी तो गुन्हेगारीकडे वळला

Education 'M.Sc' ... But, he became bike theft rather than bureaucrats | शिक्षण ‘एमएस्सी’... पण, नोकरदाराऐवजी बनला दुचाकीचोर; खर्चासाठी निवडला चुकीचा रस्ता!

शिक्षण ‘एमएस्सी’... पण, नोकरदाराऐवजी बनला दुचाकीचोर; खर्चासाठी निवडला चुकीचा रस्ता!

Next
ठळक मुद्देपुण्यात एका क्लासवर शिक्षक म्हणून राहिला. त्याच्याकडून विविध कंपनीच्या ४ दुचाकी जप्त केल्या.

बीड : आई-वडिलांनी काबाडकष्ट करून मुलाचे एमएस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्याला पुण्याला पाठविले. मात्र, पुण्यातील खर्च भागत नसल्याने तो चक्क दुचाकीचोर बनला. याच चोरट्याच्या सोमवारी बीडमध्ये मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकाने केली. उच्चशिक्षित असतानाही परिस्थिती आणि जादा पैशांच्या लालसेपोटी तो गुन्हेगारीकडे वळल्याचे सांगितले जात आहे. असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. 

शहाजी पुरी (२८ रा.खांडे पारगाव ता.बीड) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. आई-वडिल, दोन बहिणी आणि एक भाऊ असा त्याचा परिवार. घरी तीन एकर शेती. शेतीवर कुटुंबाचा गाडा चालत नसल्याने वडील मजुरी करतात. अशा परिस्थितीतही वडिलांनी शहाजीचे शिक्षण पूर्ण केले. त्याचा एमएससी पर्यंतचा सर्व खर्च केला. त्यानंतर तो मागील दोन वर्षांपासून पुण्याला गेला. येथे एका क्लासवर शिक्षक म्हणून राहिला. येथे केवळ दहा ते बारा हजार रूपये मिळायचे. मेट्रोसिटीमध्येही पगार खुपच कमी होता. त्यामुळे त्याचा खर्च भागत नव्हता. इतरांसारख्या त्याच्याही अपेक्षा वाढल्या होत्या. असे असतानाच त्याच्या मनात दुचाकी चोरीचा विषय आला.

नोकरी सोडून चार दिवस विचार केल्यावर तो बीडला आला आणि दुचाकी चोरली. याच दुचाकीतून त्याला २५ हजार रूपये मिळाले. त्याला लालच लागली. त्यानंतर तो पुण्यात गेला. नोकरी सोडून दुचाकी चोरीचा व्यवसाय सुरू केला होता. सध्या तो जोमात असतानाच सपोनि अमोल धस, पोउपनि रामकृष्ण सागडे यांना माहिती मिळाली. त्यांनी याबाबत सोमवारी सापळा लावला. या सापळ्यात शहाजी अलगद अडकला. त्याला खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याच्याकडून विविध कंपनीच्या ४ दुचाकी जप्त केल्या.

शहाजीला सध्या बीड शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, पोनि. घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे सपोनि अमोल धस, नसीर शेख, साजीद पठाण, सखाराम पवार, राजू वंजारे, विशेष पथकाचे पोउपनि. रामकृष्ण सागडे, पांडुरंग देवकते, अंकुश वरपे, गणेश नवले, रेवणनाथ दुधाने, जयराम उबे आदींनी केली.

दुचाकी विकून पुन्हा तिचीच चोरी
एक दुचाकी चोरली की ती विक्री करून पैसे काढायचे. पुन्हा चार महिन्यांनी त्याच दुचाकीवर पाळत ठेवून तिची चोरी करायची, असा फंडा शहाजीचा होता. तीच दुचाकी पुन्हा चोरल्यामुळे मालक कागदपत्रे नसल्याने तिची तक्रार द्यायला ठाण्यात जात नव्हता. हा प्रकार शहाजीला माहीत होता. पुन्हा त्याच दुचाकीची पुन्हा विक्री करायचा. हा फंडा त्याचा अनेक ठिकाणी यशस्वी झाला होता.शहाजी हा हुशार होता. मात्र, परिस्थितीमुळे तो गुन्हेगारीकडे वळला. त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. २८ फेब्रुवारीला त्याची एमपीएससीची लेखी परीक्षा होती, असे सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वीच त्याला अटक झाली.

Web Title: Education 'M.Sc' ... But, he became bike theft rather than bureaucrats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.