शाळांमध्ये बाला उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:44 AM2021-06-16T04:44:25+5:302021-06-16T04:44:25+5:30
बीड : जिल्ह्यातील शाळांमध्ये बाला (बिल्डिंग ॲज ए लर्निंग एड) उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांची ...
बीड : जिल्ह्यातील शाळांमध्ये बाला (बिल्डिंग ॲज ए लर्निंग एड) उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांची केले.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सुंदर माझे कार्यालय’ व ‘माझी शाळा सुंदर शाळा’ व बाला उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार १५ जून रोजी स्काऊट भवन येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी शिक्षणाधिकारी बोलत होते. यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी तुकाराम पवार, सहायक कार्यक्रमाधिकारी नारायण नागरे, जिल्हा समन्वयक आसाराम काशीद, शिक्षण विभाग कोविडचे जिल्हा समन्वयक राहुल चाटे, भागवत शिंदे, अविनाश गजरे आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक संदीप पवार, सोमनाथ वाळके व मोहम्मद इसाक यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी ‘सुंदर माझे कार्यालय’ व ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व मुद्द्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या अनुषंगाने शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत संवाद साधला व आढावा घेतला. यावेळी बाला डिझाइन आयडिया संकल्पना राबविण्याबाबत मार्गदर्शन केले, तसेच याबाबतचे काम विहित वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी नारायण नागरे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. तुकाराम पवार यांनी आभार मानले.
===Photopath===
150621\15_2_bed_18_15062021_14.jpeg~150621\15_2_bed_12_15062021_14.jpeg
===Caption===
जि. प. कार्यशाळा~जिल्हा परिेषद शिक्षकांच्या कार्यशाळेत बोलताना शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी. यावेळी जिल्हाभरातून प्रातिनिधीक स्वरूपात मुख्याध्यापक उपस्थित होते.