शीतपेयांच्या खपावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:33 AM2021-04-21T04:33:20+5:302021-04-21T04:33:20+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. परिणामी कोरोनाची भीती जनमानसात वाढत चालल्याने त्याचा ...
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. परिणामी कोरोनाची भीती जनमानसात वाढत चालल्याने त्याचा मोठा परिणाम शीतपेयांच्या खपावर झाला आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी उकाडा वाढला असला तरी शीतपेये, आईस्क्रीम खाणे नागरिक टाळत आहेत. व्यवसायावर परिणाम झाला असल्याने विक्रेते धास्तावले आहेत.
मजुरांपुढे संकट
अंबाजोगाई : राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या आजाराने कहर मांडला आहे. याचा विपरीत परिणाम म्हणून मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्या हालअपेष्टा वाढत चालल्या आहेत. पोटाची खळगी कुठे व कशी भरावी? असा प्रश्न मजूर वर्गात निर्माण झाला आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाची स्थिती कमी जास्त प्रमाणात असल्याने रोजगार निर्मिती मंदावली आहे. शहरी भागात व ग्रामीण भागात अनेक मजूर बेरोजगार आहेत.
फळविक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा
अंबाजोगाई : सध्या फळविक्रेत्यांना मुभा देण्यात आली असली तरी कडक निर्बंधामुळे ग्राहक घराबाहेरच पडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फळविक्रेत्यांना ग्राहकांची मोठी प्रतीक्षा आहे. कोरोनाची भीती असल्याने काही ग्राहक बाहेरची खरेदी करणे टाळत आहेत. फळांसोबतच भाजीपाल्याचीही विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकून जाण्याची वेळ आली आहे.
-----
थंड पाण्याच्या जारला मागणी वाढली
अंबाजोगाई : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या उन्हामुळे उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांनी घरात कूलरचा आधार घेतला आहे. वाढत असलेल्या तापमानामुळे थंड पाण्याच्या जारची मागणी वाढली आहे. अनेक जार विक्रेते संचारबंदीच्या काळातही शहरातील विविध भागात सकाळी घरपोच सेवा देत आहेत.