विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:03 AM2021-02-28T05:03:26+5:302021-02-28T05:03:26+5:30

बीड : गेल्या २५ वर्षांपासून बीड शहरात कसलीही करवाढ न करता बीड नगर परिषदेच्या अथक परिश्रमातून शहर विकासाचा संकल्प ...

Efforts are being made to provide various infrastructure facilities | विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील

विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील

googlenewsNext

बीड : गेल्या २५ वर्षांपासून बीड शहरात कसलीही करवाढ न करता बीड नगर परिषदेच्या अथक परिश्रमातून शहर विकासाचा संकल्प पूर्णत्वास आपण नेत आहोत. सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा, विद्युत, स्वच्छता, नगररचना यासाठी पाठपुरावा करून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून बीड शहरासाठी मोठा निधी उपलब्ध करून विविध विकास कामे पूर्ण केली. या वर्षी विविध योजनांचे आराखडे तयार करून पुढील वर्षात बीड शहराचा कायापालट करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.

बीड शहराला विकासाकडे नेणारा हा शिलकी अर्थसंकल्प असून २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये महसुली उत्पन्न घरपट्टी, पाणीपट्टी, बेटरमेंट चार्ज, बांधकाम परवानगी, गुंठेवारी चार्जेस, शासनाकडून मिळणारे महसुली अनुदान या स्वरूपात ९१ कोटी ४४ लक्ष ३५ हजार तर शासनाकडून मिळणारे भांडवली अनुदान १८५ कोटी ७६ लाख व अंदाजे शिल्लक २ लक्ष असे एकूण २७७ कोटी २२ लाख ३५ हजार इतके उत्पन्न प्राप्त होणार आहे. त्या नुसार २७७ कोटी १६ लाख १२ हजार खर्च गृहीत धरता ६ लाख २३ हजार शिलकीचे अंदाजपत्रक सादर करत असल्याचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.

२६ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बीड नगरपालिकेचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सादर केला. यावेळी ते बोलत होते. बीड नगरपालिकेचे उत्पन्न कमी असतानाही विविध योजनांच्या माध्यमातून आपण सर्वच विभागाला नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे उत्पन्नापेक्षा ११ कोटी ९१ लाख अधिकचा खर्च करावा लागला. हा खर्च इतर अनुदानातून भागवण्यात आला.

अमृत योजनेसाठी शासनाकडून ११४ कोटी मंजूर झाले आहेत येत्या दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे १८० किलोमीटर लांबीची पाइपलाइन झाली आहे. सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे नगरपालिकेचे २० लाख रुपये वीज बिल वाचणार आहे. बीड शहरात १६५ कोटीची भुयारी गटार योजनेचे काम चालू असून एकूण १४३ किलोमीटर पैकी ५५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे, असे ते म्हणाले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, सर्व विभागाचे सभापती नगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी नगरसेवक उपस्थित होते.

===Photopath===

270221\27bed_9_27022021_14.jpg

===Caption===

२६ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बीड नगरपालिकेचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी सादर केला. 

Web Title: Efforts are being made to provide various infrastructure facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.