बीड जिल्ह्यासाठी मिळाल्या आठ बायपॅप मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:41 AM2021-06-09T04:41:46+5:302021-06-09T04:41:46+5:30
अंबाजोगाई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांमधील धोका लक्षात घेता त्याची पूर्वतयारी म्हणून राज्याचे पर्यटनमंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ...
अंबाजोगाई :
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांमधील धोका लक्षात घेता त्याची पूर्वतयारी म्हणून राज्याचे पर्यटनमंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील बीड येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला ४ व लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरला ४ अशा एकूण ८ बायपॅप मशीन दाखल झाल्या. जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या हस्ते या मशीन प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी या बायपॅप मशीन आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत. आरोग्य यंत्रणेला आवश्यक व दर्जेदार अशा ज्याची अंदाजे किंमत ७२ लाखांपेक्षा अधिक आहे. या मशीन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सूर्यकांत गीते व स्त्री रुग्णालयाच्या (स्वतंत्र कोविड सेंटर) अधीक्षक डॉ. अरूणा केंद्रे यांच्याकडे सोपवण्यात आल्या. यावेळी जिल्हा संघटक योगेश नवले, केज तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे, अंबाजोगाई तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, माजी उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी, शहरप्रमुख गजानन मुडेगावकर, जि. सह संघटक अशोक गाढवे, उपशहरप्रमुख गणेश जाधव, शहर समन्वयक अर्जुन जाधव, युवा सेनेचे विनोद पोखरकर, अक्षय भूमकर, उपतालुकाप्रमुख वसंत माने, नागेश कुंभार, खंडू पालकर, हनुमंत हावळे, विशाल कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.