तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका; पारावर नव्हे तर बांधावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:26 AM2020-12-25T04:26:41+5:302020-12-25T04:26:41+5:30
रायमोहासह हाटकरवाडी , आव्हळवाडी ,येवलवाडी , वंजारवाडी , टाकळवाडी , धनगरवाडी , सांगळवाडी , डोळेवाडी , भानकवाडी (खालची ) ...
रायमोहासह हाटकरवाडी , आव्हळवाडी ,येवलवाडी , वंजारवाडी , टाकळवाडी , धनगरवाडी , सांगळवाडी , डोळेवाडी , भानकवाडी (खालची ) (वरची ), कान्होबाची वाडी व कोळवाडी या आठ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होणार आहेत. शिरूरशहराजवळील कान्होबाची वाडी, कोळवाडी ग्रामपंचायत निवडणुका असल्याने शहर आचारसंहितेत आहे .
आठ ग्रामपंचायतीसाठी ६४ सदस्य निवडून द्यावे लागणार आहे. त्यात ३६ महिला व २८ पुरूष सदस्य असूून आरक्षणानुसार त्या त्या जागा लढवल्या जाणार आहेत . आठपैकी राममोहन ग्रामपंचायतसाठी फक्त ११ सदस्य संख्या तर दोन ग्रामपंचायत ९ आणि उर्वरित ७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए एस गर्जे, एस जी प्रधान , एस एस दिख्खत ,एवले ए. के. यांची नियुक्ती आहे .
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवार (२३) पासून सुरुवात झाली असून मुदत ३० डिसेंबरपर्यत आहे. ३१ ला छाननी व ४ जानेवारीला अर्ज मागे घेता येणार आहे. १८ जानेवारीला निवडणूक निकाल जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक विभाग तहसील सूत्रांकडून देण्यात आली.