एकता मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:36 AM2021-02-20T05:36:36+5:302021-02-20T05:36:36+5:30

शिरुरकासार : तालुक्यातील श्री गुरुविरुपाक्ष साहित्य नगरी,मानूर येथे तिसऱ्या एकता मराठी साहित्य संमेलनाचा समारोप गुरुवारी उत्साहात झाला. ...

Ekta Marathi Sahitya Sammelan's soup rang | एकता मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले

एकता मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले

Next

शिरुरकासार : तालुक्यातील श्री गुरुविरुपाक्ष साहित्य नगरी,मानूर येथे तिसऱ्या एकता मराठी साहित्य संमेलनाचा समारोप गुरुवारी उत्साहात झाला. दोन दिवसांच्या या संमेलनामुळे साहित्यप्रेमी रसिकांना आणि तालुक्यातील नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली.

कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षण या विषयावरील परिसंवादात प्रा.डॉ.सुधीर येवले आणि विषयतज्ज्ञ संध्या कुलकर्णी यांनी विचार मांडले . त्यानंतर ग्रामीण कथाकार भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन कार्यक्रमात संगिता होळकर-औटी यांच्यासह बालकथाकार पूजा सुरसे,ऋतुजा खेडकर,सोफियान पठाण यांनी सहभाग घेतला. दुपारी महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमात शाहीर अनिलसिंह तिवारी आणि नकलाकार घोडके यांनी चांगलीच धमाल उडवून दिली. तर रेणुका विद्यालय,मानूर,घाटशिळा विद्यालय,घाटशीळ पारगाव,दहिफळे वस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून संमेलनाला एका वेगळ्या उंचीवर नेले.

नवोदित आणि अनुभवी कवींनी एकाहुन एक कविता सादर करून कवी संमेलनात रंगत आणली. अध्यक्ष कवी माधव सावंत हे होते. लक्ष्मण खेडकर,प्रा.डॉ.अशोक घोळवे,श्रावण गिरी,दिपक महाले,संदीप काळे,प्रा.डॉ.विठ्ठल जाधव,सुरेखा येवले,युवराज वायभासे,श्रीराम गिरी,केशव कुकडे,इम्रान शेख,मनिषा लबडे,जया कुलथे,देविदास शिंदे,अविनाश बुटे,अजिनाथ ठोंबरे,द.ल.वारे,महेश मगर,भाऊसाहेब नेटके,सुनिल केकाण,सचिन अभंग,राजेंद्र लाड,संगीता होळकर,मधुकर केदार,राहुल ससाणे,निलेश दौंड,अण्णासाहेब तहकिक,शहादेव सुरासे,संध्याराणी कोल्हे,नानासाहेब खरात,शहारुख लखाणे,संजय राठोड,सानिका खेडकर,आकांक्षा सोनवणे,अनघा कुलकर्णी,संस्कृती बडे यांनी आपल्या कविता सादर केल्या. सूत्रसंचलन के.बी.शेख यांनी केले.

साहित्य संमेलनातील ठराव

संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आणि प्राथमिक शिक्षण मातृभाषेत अनिवार्यपणे करणे,शासकीय कार्यालयातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी मराठी भाषेतच आपली स्वाक्षरी करणे,भाषा संवर्धनासाठी वरीष्ठ स्तरावरून विविध उपक्रमांचे आयोजन करणे,मानूर येथील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा असलेल्या शिल्पकृतीचे पुरातत्व विभागाने संवर्धन करणे,सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने शिरुर शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांना आणि उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पाणपोईची उभारणी करणे असे पाच ठराव मंजूर करण्यात आले.

‘ अंतरीचे धावे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कवीसंमेलन सत्रात प्रसिद्ध कवी श्रावण गिरी यांच्या अंतरीचे धावे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन टिचर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी कवीसंमेलनाध्यक्ष माधव सावंत,ग्रामीण कथाकार भास्कर बडे,अनंत कराड,गोकुळ पवार यांची उपस्थिती होती.

Web Title: Ekta Marathi Sahitya Sammelan's soup rang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.