कडा जि.प.गटाची पोटनिवडणूक सव्वा वर्षे उलटले तरी होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:28 AM2021-01-17T04:28:19+5:302021-01-17T04:28:19+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेत जिल्हा परिषद हा महत्त्वाचा घटक. अनेक भावी आमदारांची राजकीय पायाभरणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून होते. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेत जिल्हा परिषद हा महत्त्वाचा घटक. अनेक भावी आमदारांची राजकीय पायाभरणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून होते. जिल्हा परिषद गटातील गावासाठी वेगळा विकास निधी ही मंजूर असतो. त्यातून काही कामे मार्गी लावता येतात, शिवाय विविध गावांचा मिळून एक गट तयार होत असल्याने, त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मिळणारा सन्मान ही मोठाच असतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य निवडीच्या निवडणुकाही मोठ्या हिरिरीने लढल्या जातात. मात्र, कडा गटाचे सदस्य आमदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यापासून सव्वा वर्षे उलटले, तरी येथील पोटनिवडणुका झाल्या नाहीत. आ. बाळासाहेब आजबे कडा जिल्हा परिषद गटाचे सदस्य होते. ऑक्टोबर, २०१९ मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याला आता सव्वा वर्ष उलटले आहे. कोविडमुळे येथील पोटनिवडणूक झाली नसेल असेल? म्हणावे, तर मधल्या काळात पदवीधर मतदार संघ निवडणूक झाली. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरात आहेत. शुक्रवारी त्यासाठी मतदान झाले. तथापि जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाला या निवडणुकीचा विसर कशामुळे पडला असेल, असा प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करत आहेत.
(नोट- बातमीत नको तिथे प्रश्नचिन्ह? पडली आहेत, कृपया चेक करणे. ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?)