माधव जाधव यांची काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्ड सदस्यपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:34 AM2021-02-16T04:34:10+5:302021-02-16T04:34:10+5:30

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिल्लीहून ३७ जणांची महाराष्ट्र प्रदेश ...

Election of Madhav Jadhav as a Member of Parliamentary Board of Congress | माधव जाधव यांची काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्ड सदस्यपदी निवड

माधव जाधव यांची काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्ड सदस्यपदी निवड

googlenewsNext

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिल्लीहून ३७ जणांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड (संसदीय समिती) यादी जाहीर केली. या यादीमध्ये नूतन प्रदेशाध्यक्ष तथा अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या शिफारशीमुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अंतर्गत असणाऱ्या किसान सेल या विभागाचे स्टेट चेअरमन यांना या मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यामध्ये किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. माधव जाधव यांचा समावेश स्टेट चेअरमन किसान सेल म्हणून केला आहे. सर्वसामान्यांच्या तसेच शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेऊन अनेक आंदोलने ॲड. जाधव यांनी केलेली आहेत. त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.

Web Title: Election of Madhav Jadhav as a Member of Parliamentary Board of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.