निवडणूक पोरखेळ नाही, लोकप्रतिनिधी जबाबदारीने निवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 11:52 PM2019-10-09T23:52:43+5:302019-10-09T23:53:43+5:30
बीड : आपला लोकप्रतिनिधी निवडताना जबाबदारीने निवडावा. जयदत्त आण्णा हे विकासिप्रय नेतृत्व आहे. ही पोरखेळ असलेली निवडणूक नाही. आण्णा ...
बीड : आपला लोकप्रतिनिधी निवडताना जबाबदारीने निवडावा. जयदत्त आण्णा हे विकासिप्रय नेतृत्व आहे. ही पोरखेळ असलेली निवडणूक नाही. आण्णा हे अनुभवी व सक्षम असे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या रूपाने शिवसेनेचा अनुशेष भरून काढायचा आहे असे प्रतिपादन बाळासाहेब पिंगळे यांनी केले.
नाळवंडी जिल्हा परिषद सर्कलमधील जरु ड, बाभूळखुंटा तसेच मौजवाडी येथे विधानसभा निवडणूक प्रचारासाठी जयदत्त क्षीरसागर यांनी भेटी दिल्या. त्याप्रसंगी शिवेसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पिंगळे बोलत होते. यावेळी बैठकीस शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे, गणपत डोईफोडे, विलास बडगे, अरूण डाके, नितीन धांडे, जगदीश काळे, अरूण बोंगाणे, राजेंद्र राऊत, बप्पासाहेब घुगे, झुंजार धांडे, सखाराम मस्के, गणेश वरेकर, रामनाथ काकडे, बबन कोरडे, शहादेव काकडे, पंजाब काकडे इत्यादींची उपस्थिती होती.
बाभळखुंटा येथील बैठकीतही धनुष्यबाणाला मतदान हाच विकासाचा रामबाण उपाय आहे असा कार्यकर्त्यांचा सूर होता. मौज, मौजवाडी येथे प्रभाकर ढेमरे व सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी गणेश वरेकर म्हणाले की, नाळवंडी सर्कलमधून नंबर एकचे मताधिक्य शिवसेनेला होणार आहे. आण्णांना आपण एकमताने ताकद दिली तर शिवसेनेकडून सर्व आश्वासने पूर्ण होतील. मतदान मशीनवर पहिल्याच क्र मांकाचे चिन्ह धनुष्यबाण असल्याचे ते यावेळी म्हणाले.
यावेळी दिनकर कदम यांच्या नेतृत्वाखाली डी.सी.सी. बँकेचे संचालक स्व.बन्सीधरराव सातपुते यांचे नातू शिवम सातपुते यांच्यासह पांडूरंग सातपुते, रामेश्वर जाधव, रवि डोंगरे, राजेश डोंगरे, शरद विटकर, सुरेश सातपुते, सदाशिव सातपुते, अशोक सातपुते, लक्ष्मण सातपुते, किशोर टेकाळे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
विरोधकांच्या प्रयोगाला बळी पडू नका
जयदत्त क्षीरसागर म्हणाले, गावागावात शासनाच्या योजना पोहोचवून त्याचा लाभ गावाला मिळवून देण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो. मतदारांनी दिलेला विश्वास पाच वर्ष निरंतर सेवा देऊन सार्थ करतो. तुमच्यासमोर जी कामे केली आहेत ती आपण पुढाकार घेऊन केलेली आहेत.
केवळ आश्वासने दिलेली नाहीत. विरोधक रोटी-बोटी-चपटीचा प्रयोग करतील त्यांना आपण बळी पडू नका. केंद्रात जे सरकार आहे ते सरकार राज्यात येणार आहे त्यामुळे विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी आपली साथ मला द्यावी असे आवाहन त्यांनी केले.