पाटोदा तालुक्यातील सरपंच, उपसरपंचांची १५ व १६ रोजी निवड - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:32 AM2021-02-13T04:32:26+5:302021-02-13T04:32:26+5:30
पाटोदा : पाटोदा तालुक्यातील निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड दिनांक १५ व १६ फेब्रुवारी या दोन दिवसात होणार ...
पाटोदा : पाटोदा तालुक्यातील निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड दिनांक १५ व १६ फेब्रुवारी या दोन दिवसात होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील ढाकणे यांनी दिली.
ऑक्टोबर २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या पाटोदा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार १५ जानेवारी रोजी निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर बीड जिल्हाधिकाऱ्यांनी १५ व १६ फेब्रुवारी या दोन दिवसात पाटोदा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सरपंचपदाच्या निवडीसाठी पाटोदा तहसीलदारांनी आदेश जारी केले असून, अध्यासी अधिकाऱ्यांची निवड केली आहे. तालुक्यातील दासखेड, पारगाव घुमरा, बेदरवाडी, निरगुडी, खडकवाडी व अनपटवाडी या ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड १५ फेब्रुवारी रोजी तर ढाळेवाडी, उकंडा व काकडहिरा या ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांची निवड १६ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील ढाकणे यांनी दिली.