पीक कर्जापासून पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:25+5:302021-07-15T04:23:25+5:30

माजलगाव : सर्वसामान्य शेतकरी हा पेरणीच्या काळामध्ये अडचणीत असतो. अशावेळी कर्जासाठी जे शेतकरी पात्र असतील, त्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज ...

Eligible farmers should not be deprived of crop loan - A | पीक कर्जापासून पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये - A

पीक कर्जापासून पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये - A

Next

माजलगाव : सर्वसामान्य शेतकरी हा पेरणीच्या काळामध्ये अडचणीत असतो. अशावेळी कर्जासाठी जे शेतकरी पात्र असतील, त्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज मिळाले पाहिजे, पात्र असणारा एकही शेतकरी यातून सुटता कामा नये, अशी सूचना भाई ॲड. नारायण गोले पाटील यांनी तालुक्यातील बँक अधिकाऱ्यांना दिली. पीक कर्जाबाबतच्या तक्रारीवरून तहसीलदारांनी बोलावलेल्या तालुक्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या मागणीची दखल घेऊन, मंगळवारी तहसील कार्यालय माजलगाव येथे शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. नारायण गोले पाटील व बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलावून समन्वय करण्यात आला. या बैठकीस तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा किट्टी आडगाव, शाखा टाकरवन, शाखा दिंद्रुड, शाखा माजलगाव व स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा माजलगाव बीड रोड, स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा तालखेड येथील सर्व शाखा अधिकारी यांच्यासमवेत ॲड. नारायण गोले पाटील, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी नायब तहसीलदार अशोक भंडारी यांनी पीक कर्जासंदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बैठक घेऊन पीक कर्जाच्या वाटपाचा आढावा घेतला. कोणीही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची बँकांनी दक्षता घेण्याची सूचना गोले यांनी केली.

यावेळी उपस्थितांनी आपल्या अडचणी मांडल्या. यावेळी सर्वसमावेशक तोडगा काढण्यात आल्याने बँक कर्मचारी व शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. या बैठकीस लहू सोळंके, सतीश रिंगणे, बालासाहेब शिंदे, अशोक सुरवसे, सिद्धेश्वर गायकवाड, सुदाम चव्हाण, सुभाष थोरात, कृष्णा सोळंके,देशमाने, पंडित यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

130721\2644purusttam karva_img-20210713-wa0031_14.jpg

Web Title: Eligible farmers should not be deprived of crop loan - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.