अन्याय दूर करा, आत्महत्येस प्रवृत्त करू नका; संतप्त रुग्णवाहिका चालकांचे ठिय्या आंदोलन

By सोमनाथ खताळ | Published: August 23, 2022 01:23 PM2022-08-23T13:23:50+5:302022-08-23T13:24:13+5:30

बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला ठिय्या

Eliminate injustice, do not encourage suicide; The ambulance driver was furious, thiyya agitation in Beed | अन्याय दूर करा, आत्महत्येस प्रवृत्त करू नका; संतप्त रुग्णवाहिका चालकांचे ठिय्या आंदोलन

अन्याय दूर करा, आत्महत्येस प्रवृत्त करू नका; संतप्त रुग्णवाहिका चालकांचे ठिय्या आंदोलन

Next

बीड : जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिकाचालकांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. कंत्राटदार वेळेवर वेतन देत नाही मध्येच कामावरून कमी करून गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देत आहे. हा आमच्यावर अन्याय असून तो दूर करावा. अन्यथा या कंत्राटदाराच्या त्रासापायी आम्हाला आत्महत्येस प्रवृत्त करू नका, असा इशारा या चालकांनी प्रशासनाला दिला आहे. चालकांचा हा संताप पाहून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांची दुपारी भेट घेऊन समजूत घातली तसेच त्यांना विविध संघटनांनी पाठिंबाही दिला.

पूर्ण वेतन शासननिर्णयानुसार देण्यात यावे, कंत्राटदारामार्फत होणारी पिळवणूक थांबवावी, एकाही वाहनचालकाला कमी करू नये, मासिक पगार १ ते १० तारखेच्या आत द्यावा, अपघाती विमा १० लाख रुपये देण्यात यावा, ॲडव्हान्स कंपनीवर मागण्या मान्य न केल्यास कारवाई करावी, ठेकेदार पद्धत बंद करून एनएचमधून वाहनचालकांना नियुक्ती द्यावी, अशा विविध मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या. यावेळी जिल्हाभरातून वाहनचालक आले होते तसेच दुपारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत मागण्या समजून घेतल्या. त्यांच्यासमवेत सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख हे होते.

कर्मचारी संघटनेचाही पाठिंबा
वाहनचालकांवर होत असलेला अन्याय पाहून आरोग्य कर्मचारी संघटनाही त्यांच्या पाठीशी उभा राहिली आहे. आंदोलनस्थळी जावून त्यांना पाठिंबा देण्यात आला. यावेळी अध्यक्ष मनेंद्र बागलाने, उपाध्यक्ष वसंत सानप यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

Web Title: Eliminate injustice, do not encourage suicide; The ambulance driver was furious, thiyya agitation in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.