मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाज्योती संस्थेतील त्रुटी दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:28+5:302021-05-22T04:31:28+5:30

बीड : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी स्थापन करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील ( महाज्योती ) ...

Eliminate the shortcomings of Mahajyoti Sanstha for the academic progress of backward class students | मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाज्योती संस्थेतील त्रुटी दूर करा

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाज्योती संस्थेतील त्रुटी दूर करा

Next

बीड : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी स्थापन करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील ( महाज्योती ) अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभारामुळे संस्थेला मिळालेले सव्वाशे कोटी रुपये खर्चाअभावी शासनाकडे परत गेले आहेत. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे मिळालेला निधी परत गेला आहे परंतु यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित राहू नयेत म्हणून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे. संस्थेतील त्रुटी दूर करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सारथी आणि बार्टी या संस्थांच्या धर्तीवर महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आल्यानंतर मागील वर्षी एकशे पंचावन्न कोटी रुपयांच्या निधीची तरतूद राज्याने केली होती. परंतु अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्यतेमुळे हा निधी शासनाकडे परत गेला तर प्राप्त झालेला एकतीस कोटी निधी देखील संस्थेला खर्च करता आला नाही. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. संस्थेच्या या अनागोंदीमुळे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

महाज्योती संस्थेमार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न व्हावेत, विद्यार्थ्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्थेला मिळणाऱ्या निधीचा पूर्ण वापर व्हावा व प्रशिक्षण योजना सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी महाज्योती संस्थेतील त्रुटींची गांभीर्याने दखल घेऊन मुख्यमंत्री योग्य कार्यवाही करतील अशी अपेक्षा खा. मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Eliminate the shortcomings of Mahajyoti Sanstha for the academic progress of backward class students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.