वित्त आयोगाच्या निधीत अपहार, सरपंच बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:15+5:302021-07-14T04:39:15+5:30

अंबाजोगाई : तालुक्यातील मगरवाडी-दस्तगीरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच ज्योती मारुती माने यांच्याविरुध्द १४ व्या वित्त आयोगातील निधीतील अपहार ...

Embezzlement in Finance Commission funds, to Sarpanch Bad | वित्त आयोगाच्या निधीत अपहार, सरपंच बडतर्फ

वित्त आयोगाच्या निधीत अपहार, सरपंच बडतर्फ

Next

अंबाजोगाई : तालुक्यातील मगरवाडी-दस्तगीरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच ज्योती मारुती माने यांच्याविरुध्द १४ व्या वित्त आयोगातील निधीतील अपहार व कामकाजातील अनियमिततेचा आरोप सिध्द झाल्यामुळे अप्पर विभागीय आयुक्तांनी सरपंचांना पदावरून बडतर्फ केले. तसेच या व्यवहारास जबाबदार धरून तत्कालीन ग्रामसेवक भोरे यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत असल्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मगरवाडी दस्तगीरवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. २०१७ मध्ये सरपंच पदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत या दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी ज्योती मारुती माने यांना सरपंचपदी निवडून दिले. ग्रामपंचायतीच्या पहिल्याच मासिक सभेपासून कामकाजात अनियमितता होत असल्याबाबत सदस्य शिवाजी दगडू भोसले, ज्योती विनायक माने, बालासाहब मुगे या सदस्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आली. त्याची खुन्नस ठेवून ग्रामसेवकाने तक्रारदार सदस्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला. मात्र सरपंच व ग्रामसेवकाच्या दडपशाहीस न जुमानता तक्रारदार सदस्यांनी ग्रा. पं. मधील अनियमितता व्यवहाराची चौकशी करून दोषीवर कारवाईची मागणी लावून धरली.

तक्रारदार सदस्यांनी केलेले हे सर्व आरोप गटविकास अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये खरे आढळून आले. त्यामुळे तक्रारदार सदस्यांचा अर्ज स्वीकारून तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा २१ जानेवारी २०२१ चा प्रस्ताव मान्य करून अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी मगरवाडी-दस्तगीरवाडीच्या सरपंच ज्योती मारुती माने यांना सरपंच पदावरून बडतर्फ केले.

गैरव्यवहाराचा कळस

१४ व्या वित्त आयोगातून जि. प. शाळेसाठी प्रत्येकी एलईडी टी.व्ही., ३ पथदिवे, अंगणवाडीसाठी खेळणी कीट, जि. प. शाळेतील मुलांसाठी ड्रेस खरेदी, महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण, सॅनिटरी नॅपकीन खरेदी न करता फक्त ग्रामपंचायतीच्या हिशेबात खर्चाची पावती लावली. जुन्या पाईपलाईनची दुरुस्ती करून नवीन पाईपलाईन केल्याचे दाखवून अपहार, ग्रामपंचायतीसाठी खुर्च्या खरेदीत गैरव्यवहार, पंतप्रधान आवास योजनेचे जियो टॅगिंग करण्यासाठी अनेक ग्रामस्थांकडून प्रत्येकी २५० रुपये वसूल केले. ते ग्रामपंचायत खात्यावर जमा न करता परस्पर खर्च केले. मासिक सभेत मंजुरी न घेता अनियमितता व गैरप्रकार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले होते.

Web Title: Embezzlement in Finance Commission funds, to Sarpanch Bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.