चोरीला गेलेल्या मोबाइलमधून ९८ हजार रुपयांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:32 AM2021-01-20T04:32:52+5:302021-01-20T04:32:52+5:30
तालुक्यातील जागीरमोहा येथील रमेश पांडुरंग मंदे हे कर्नाटक राज्यात लैला शुगर, खानापूर या कारखान्यावर ऊसतोड मजुरी करतात. २ जानेवारी ...
तालुक्यातील जागीरमोहा येथील रमेश पांडुरंग मंदे हे कर्नाटक राज्यात लैला शुगर, खानापूर या कारखान्यावर ऊसतोड मजुरी करतात. २ जानेवारी रोजी त्यांचा मोबाइल बिडी (कर्नाटक) येथे बाजारात दुपारी ३ च्या सुमारास चोरीला गेला. जागीरमोहा येथे मतदान असल्याने ते शुक्रवारी गावाकडे आले. १५ रोजी त्यांनी आपल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा माजलगाव रोड, धारूर येथील खात्यावर त्यांनी ४५ हजार रुपये जमा केले. दरम्यान, नवीन मोबाइल व सिम चालू केले असल्यामुळे त्यांना त्यांच्या मोबाइलवर रक्कम काढल्याचे संदेश प्राप्त झाले. यानंतर त्यांनी एटीएममध्ये शिल्लक रक्कम तपासली असता त्यांच्या रकमेचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत बँकेत सूचना दिली. चोरीला गेलेल्या मोबाइलमधून ‘फोन पे ॲप’च्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने ९८ हजार रुपयांचा अपहार केल्याचा तक्रार अर्ज बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी दिला.