अंबाजोगाईत इम्युनिटी वाढवणाऱ्या सेंद्रिय भाजीपाल्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:35 AM2021-05-20T04:35:52+5:302021-05-20T04:35:52+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून माणसाची जीवनपद्धती बदलत चालली आहे. सध्या आहारातून रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल, याला प्राधान्य दिले जात ...

Emphasis on organic vegetables that boost immunity in Ambajogai | अंबाजोगाईत इम्युनिटी वाढवणाऱ्या सेंद्रिय भाजीपाल्यावर भर

अंबाजोगाईत इम्युनिटी वाढवणाऱ्या सेंद्रिय भाजीपाल्यावर भर

Next

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून माणसाची जीवनपद्धती बदलत चालली आहे. सध्या आहारातून रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल, याला प्राधान्य दिले जात आहे. जीवनसत्व वाढविणारी फळे व भाजीपाला याला महत्त्व प्राप्त झाले आहे. नागरिकांची ही मागणी पाहून शेतकऱ्यांनी ही आपला मोर्चा इम्युनिटी वाढवणाऱ्या भाज्या व फळे लागवडीकडे वळविला आहे. लिंबू, अद्रक, पुदिना, हळद या अपारंपरिक पिकांसह पारंपरिक भाजीपाला पिकांना पसंदी दिली जात आहे. ६० ते ९० दिवसांत येणारा हा भाजीपाला शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या तर नागरिकांना शारीरिकदृष्ट्या सक्षम करणार आहे.

कोरोनामुळे भाजीपाला लागवड करून तो सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. शारीरिक क्षमता वाढविणाऱ्या भाजीपाल्याला मोठी मागणी वाढली आहे.

युवक शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून सेंद्रिय भाजीपाला व फळ लागवड सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन घेतो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सेंद्रिय व इम्युनिटी वाढवणाऱ्या भाजीपाल्याला मागणी वाढली आहे.

- गणेश रुद्राक्ष, प्रगतिशील शेतकरी, मांडवा

===Photopath===

190521\img-20210507-wa0168_14.jpg~190521\img-20210507-wa0170_14.jpg

Web Title: Emphasis on organic vegetables that boost immunity in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.