पोषण, शिक्षणानंतर आता महिला सबलीकरणांवर देणार भर - पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:56 AM2019-08-25T00:56:51+5:302019-08-25T00:58:18+5:30
परळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना सन्मान मिळवून देणा-या विविध योजना राबविल्यामुळे समाजात महिला आज स्वाभिमानाने वावरत आहे. ...
परळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना सन्मान मिळवून देणा-या विविध योजना राबविल्यामुळे समाजात महिला आज स्वाभिमानाने वावरत आहे. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला, तिचे पोषण आणि शिक्षणही होत आहे, आता खरी गरज आहे, तिच्या सबलीकरणाची, त्यामुळे आगामी काळात यावरच भर देण्याचे ध्येय आहे, असे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले. बेटी बचाओ, बेटी पढाओ बरोबरच बेटी बढाओ चा नारा यावेळी त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालय व महिला बालविकास विभागाच्या वतीने अक्षता मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अंतर्गत महिला मेळावा व गुणवंतांच्या सत्कार कार्यक्र मात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी खा.डॉ प्रितम मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, गयाताई कराड, डॉ शालिनी कराड, शरयू हेबाळकर, उमाताई समशेट्टे, चंद्रशेखर केकान आदी यावेळी उपस्थित होत्या.
कार्यक्र माचे प्रास्ताविक डॉ. शालिनी कराड यांनी केले तर बालविकास प्रकल्प अधिकारी हुंडेकरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी पंकजा मुंडे यांच्या हस्ते बेबी केअर किटचे वाटप, माझी कन्या भाग्यश्री योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, जनजागृती करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान तसेच शालेय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.