‘त्या’ कर्मचाऱ्याची डीबीतून होणार हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 11:58 PM2018-10-07T23:58:39+5:302018-10-07T23:59:07+5:30

कसलाही संबंध नसताना ‘आर्थिक’ फायद्यासाठी दुचाकीस्वारांची अडवणूक करणे शिवाजीनगर ठाण्यातील डीबी पथकातील कर्मचा-यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी त्यांचा ‘डिफॉल्ट रिपोर्ट’ तयार केला असून, सोमवारी तो पोलीस उपअधीक्षकांकडे पाठविला जाणार आहे.

'That' employee will be expelled from DBB | ‘त्या’ कर्मचाऱ्याची डीबीतून होणार हकालपट्टी

‘त्या’ कर्मचाऱ्याची डीबीतून होणार हकालपट्टी

Next
ठळक मुद्देपोलीस निरीक्षकांकडून ‘डिफॉल्ट रिपोर्ट’ तयार : दुचाकीस्वाराची केली होती पिळवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कसलाही संबंध नसताना ‘आर्थिक’ फायद्यासाठी दुचाकीस्वारांची अडवणूक करणे शिवाजीनगर ठाण्यातील डीबी पथकातील कर्मचा-यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी त्यांचा ‘डिफॉल्ट रिपोर्ट’ तयार केला असून, सोमवारी तो पोलीस उपअधीक्षकांकडे पाठविला जाणार आहे. त्या दोन कर्मचाºयांची डीबी पथकातून हकालपट्टी तर होणारच आहे शिवाय संपूर्ण पथकच यानिमित्ताने संशयाच्या भोवºयात अडकले आहे.
चोरीच्या दुचाकी, दुचाकीचोर समोर यावेत, या उद्देशाने पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी वाहन तपासणी मोहीम सुरू केली. याच मोहिमेदरम्यान शुक्रवारी सायंकाळी जालना येथील एकाची दुचाकी पकडली. क्रमांकाचा थोडा अडथळा होता. कागदपत्रांमधून तो दुर झाला. हा सर्व प्रकार पोलीस निरीक्षक, ठाणे अंमलदार किंवा वाहतूक शाखा पोलिसांशी संबंधीत होता. मात्र या प्रकरणात डीबीतील दोघांनी लक्ष घातले. त्या दुचाकीची चावी घेत लपवून ठेवली. हा प्रकार पोलीस निरीक्षक पुरभे यांच्यापासून लपविला. चोरटे सोडून दुचाकीस्वारांना पकडण्यात त्यांनी धन्यता मानली. मात्र हा प्रकार पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्यापर्यंत पोहचल्याने त्यांना ही दुचाकी अडवून ठेवणे चांगलेच अंगलट आले. पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी दोन कर्मचाºयांचा डिफॉल्ट रिपोर्ट तयार केला असून तो वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे. त्यांची पथकातून तर हकालपट्टी होईलच पण ठाण्यातूनही हकालपट्टी होणार असल्याचे बोलले जात आहे. जर कारवाई झाली नाही तर येणाºया काळात वरिष्ठांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल, हे निश्चीत.

Web Title: 'That' employee will be expelled from DBB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.