शासन धोरणांविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:15 AM2019-01-09T00:15:36+5:302019-01-09T00:16:30+5:30
नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, कंत्राटीकरण रद्द करावे या इतर मागण्यांसाठी ८ व ९ जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सहभागी होत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, कंत्राटीकरण रद्द करावे या इतर मागण्यांसाठी ८ व ९ जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सहभागी होत. जिल्ह्यातील कामगार, सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षकांनी मंगळवारी दुपारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करण्याचे राबवले जात असलेले धोरण रद्द करावे, सरसकट सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्रिय कर्मचाºयांप्रमाणे सर्व प्रकारचे वेतन व भत्ते प्रदान करणे, रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावेत या प्रमुख मागण्यांसाठी राज्य सरकारी, शिक्षक समन्वय समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
यावेळी कामगार, कर्मचारी, शिक्षक संयुक्त कृती समन्वय समितीचे कॉ. नामदेव चव्हाण, ज्योतीराम हुरकुडे, पी.एस.धाडगे, डी.जी.तांदळे, राजकुमार कदम, नवनाथ नागरगोजे, एस.वाय. कुलकर्णी, राजकुमार कदम, पी.डी जावळे, चंद्रकांत जोगदंडसह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान आॅनलाईन फार्मसीच्या विरोधात जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्ह्यातील ५०० केमिस्ट बांधव सहभागी होते. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अरुण बरकसे, उपाध्यक्ष अरुण काळे, सचिव सुरेश पवार, श्रीनिवास टवाणी, ईश्वर मुथ्था, नारायण मुंडे, दिनकर चाटे, सतिश चवलवार, जीवन गडगुळ, चंद्रकांत करांडे, कासोळे, अरुण पवार, पांडुरंग कुरे, जयंत अकोलकर, जगदीश शिंदे, योगेश परदेशी यांच्यासह केमिस्ट बांधवांनी एकत्र येत आॅनलाईन फार्मसीचा विरोध करत जोरदार निदर्शने केली.
बॅँक कर्मचाºयांचा संप
कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या देशव्यापी संपात आॅल इंडिया बॅँक एम्पलॉईज असोसिएशन, बॅँक एम्पलॉईज फेडरेशन आॅफ इंडियाशी संलग्न बॅँक कर्मचाºयांनी सहभाग घेतला. त्यामुळे बॅँकांचे कामकाज ठप्प झाले. मंगळवारी सकाळी शहरातील साठे चौकात बॅँक आॅफ महाराष्टÑजवळ सर्व बॅँक कर्मचारी एकत्र आले. यावेळी विपीन गिरी म्हणाले, हा संप प्रामुख्याने सरकारचे जनताविरोधी आर्थिक धोरण तसेच कामगारांविषयक धोरणांच्या विरोधात आहे. शासनाकडून विविध योजनांची कामे बॅँकेवर लादल्याने बॅँक कर्मचाºयांवर कामांचा ताण वाढला आहे. बॅँक कर्मचाºयांच्या पगारवाढीची मागणी भिजत ठेवल्याचे ते म्हणाले. यावेळी बॅँक आॅफ महाराष्टÑचे विलास कोकीळ, गोविंद कुरकुटे, एसबीआयचे मुळे, तुंगीकर, गुरु, राठोड, अझीम, पवार, अनुदीप, गमे आदींसह बॅँक कर्मचारी उपस्थित होते.