कर्मचारी कमतरतेने पाणी चोर निर्धास्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 05:23 PM2017-08-13T17:23:10+5:302017-08-13T17:23:52+5:30

कालव्याच्या मार्गातील अनेक गावातील नागरिकांनी हा कालवा जागोजागी फोडलेला आहे. यासोबतच धरणातील पाण्याची देखील मोठया प्रमाणावर चोरी होत आहे.परंतु; जलसंधारण व उपसा सिंचन विभागाच्या माजलगाव येथील कार्यालयात कर्मचा-यांची कमतरता असल्याने पाणी चोरीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. 

Employees diminish the water thief | कर्मचारी कमतरतेने पाणी चोर निर्धास्त 

कर्मचारी कमतरतेने पाणी चोर निर्धास्त 

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत

माजलगाव (बीड), दि. १३ : पैठण येथील जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याचा बराचसा भाग गेवराई व माजलगांव तालुक्यातुन माजलगांव धरणापर्यंत आलेला आहे. कालव्याच्या मार्गातील अनेक गावातील नागरिकांनी हा कालवा जागोजागी फोडलेला आहे. यासोबतच धरणातील पाण्याची देखील मोठया प्रमाणावर चोरी होत आहे.परंतु; जलसंधारण व उपसा सिंचन विभागाच्या माजलगाव येथील कार्यालयात कर्मचा-यांची कमतरता असल्याने पाणी चोरीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. 

माजलगांव धरणाच्या पाण्यावर तसेच पैठण येथुन कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम उपसा सिंचन योजनेच्या दोन शाखांमार्फत केले जाते. दोन्ही शाखांमध्ये मिळुन कालवा निरीक्षकांची 6 पदे, दप्तर कारकुनची 2 पदे व मजुरांची 6 अशी 14 पदे रिक्त आहेत. यामुळे या शाखांमार्फत आता केवळ कार्यालयीन कामच होते. प्रत्यक्ष कामासाठी येथे कर्मचारीच नाहीत.
 

बिनधास्त चोरले जाते पाणी  
धरणाकडे येणा-या कालव्याला ठिकठिकाणी लोकांनी छिद्र पाडून पाणी वळवलेले आहे. एका गावात तर चक्क बंधा-यात ओढुन घेतलेले आहे त्यामुळे पैठण वरुन निघालेल्या पाण्याच्या केवळ 10 टक्के इतकेच पाणी धरणात येते. याने  कालव्याची अगदी चाळण झाली आहे. यातच कालवा निरीक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे कालव्यावर नेमके काय चाललेय याची माहिती विभागाला फार उशिराने मिळते. माहिती मिळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तसेच कारवाईसाठी निरीक्षकच नसल्यामुळे या पाणी चोरांवर कोणतीच कारवाई करता येत नाही. यामुळे हे पाणी चोर अगदी निर्धास्त आहेत. 

दुसरीकडे, याच विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या धरणातील पाण्याचा देखील मोठया प्रमाणावर अवैधरीत्या उपसा  होत आहे. धरणावरुन शेतीसाठी पाणी उपसा करण्याचे 1586 जणांना परवाने देण्यात आलेले आहेत. यातील केवळ 350 परवाना धारकाच पाणी उपसा करत आहेत. या व्यतिरिक्त दीड ते दोन हजार मोटार मात्र विनापरवानाच पाणी उपसा करत आहेत. पाटबंधारे विभागा अंतर्गत असलेली जवळपास सर्वच कार्यालये ही सन 2000 मध्ये माजलगांव येथुन परळी येथे स्थलांतरीत झालेले आहेत. यामुळे विभागाचा सारा कारभार परळी येथून राबवला जातो. हा कारभार म्हणजे उंटावरुन शेळया हाकल्या सारखाच असल्याने पाणी चोरीला आळा घालणे अवघड झाले आहे.

कर्मचारी कमतरतेने अडचणी
कार्यालयात कर्मचा-यांच्या कमतरतेबाबत आम्ही वरिष्ठांना वेळोवेळी कळवलेले आहे. कर्मचा-यांचे संख्याबळ कमी असल्यामुळे पाणी चोरी संदर्भात कारवाई करण्यास अडचणी येतात.
- व्ही. आर.फड, शाखा अधिकारी, माजलगांव जलसंधारण व उपसासिंचन शाखा क्र.- 2

Web Title: Employees diminish the water thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.