जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी रस्त्यावर; जिल्हाधिकारी कार्यालयावर ४३ संघटनांचा मोर्चा

By अनिल भंडारी | Published: March 16, 2023 01:52 PM2023-03-16T13:52:03+5:302023-03-16T13:52:30+5:30

सिद्धी विनायक कॉम्पलेक्स परिसरात सकाळी दहा वाजेपासून जिल्हाभरातील शासकीय निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आले.

Employees on the road for old pensions; A march of 43 organizations on the Collector's office | जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी रस्त्यावर; जिल्हाधिकारी कार्यालयावर ४३ संघटनांचा मोर्चा

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी रस्त्यावर; जिल्हाधिकारी कार्यालयावर ४३ संघटनांचा मोर्चा

googlenewsNext

बीड : जुनी पेन्शन लागू करावी या व इतर मागण्यांसाठी गुरूवारी ४३ कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर विक्रमी मोर्चा काढण्यात आला. 

सिद्धी विनायक कॉम्पलेक्स परिसरात सकाळी दहा वाजेपासून जिल्हाभरातील शासकीय निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आले. तेथून  निघालेल्या विशाल मोर्चात महिलांसह पुरूष कर्मचाऱ्यांची संख्या उल्लेखनीय होती. एकच मिशन जुनी पेन्शन या घोषणेने माेर्चा मार्गावरील परिसर दुमदुमत होता. मोर्चा पुढे मार्गस्थ झाल्यानंतर सुभाष रोड, भाजी मार्केट कॉर्नर, सहयोग नगर, स्वामी समर्थ मंदिर परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती.

Web Title: Employees on the road for old pensions; A march of 43 organizations on the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.