मजुरांपुढे रोजगाराचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:33 AM2021-05-13T04:33:39+5:302021-05-13T04:33:39+5:30
बीड : वर्षभरापासून कोरोनाने कहर मांडला आहे. याचा विपरित परिणाम म्हणून मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्या हालअपेष्टा आहेत. ...
बीड : वर्षभरापासून कोरोनाने कहर मांडला आहे. याचा विपरित परिणाम म्हणून मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्या हालअपेष्टा आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न मजुरांसमोर आहे.
नातेवाईकांची धावपळ
बीड : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक रुग्णांना बेड मिळणेही अवघड बनले आहे.अशा स्थितीत आपल्या रुग्णास बेड तसेच ऑक्सिजन व आवश्यक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरुच आहे.
वाहनधारक त्रस्त
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अंबाजोगाई ते देवळा व अंबासाखर ते धानोरा, राडी ते मुडेगाव अशा अनेक रस्त्यावर पडलेल्या त्या खड्ड्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालवताना मोठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.
पाण्याचा अपव्यय
अंबाजोगाई : शहरात अनेक भागात पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. उन्हाळ्यात ही पाणीटंचाई भासत नाही. त्याची नागरिकांना किंमत नसल्यासारखे झाले आहे. ज्यावेळी पाणीपुरवठा सुरू असतो. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
प्लास्टिक बंदीला खो
बीड : शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे. प्लास्टिकचा वापर पर्यावरणाला घातक ठरणारा आहे. प्रशासनाने वारंवार सूचना करूनही लहान ते मोठे व्यावसायिक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत आहेत. याला प्रतिबंध घालण्याची मागणी होत आहे.