आमदार सोळंके पुत्राच्या केदारेश्वर नगरीच्या रस्त्यासाठी ग्रामपंचायतच्या प्लाॅटवर अतिक्रमण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 06:23 PM2023-06-14T18:23:11+5:302023-06-14T18:24:44+5:30

शेलापुरी ग्रामस्थांनी अतिक्रमण हटविण्यासाठी दिला आंदोलनाचा इशारा

Encroachment on Gram Panchayat plot of MLA Prakash Solanke's son for Kedareshwar Nagari road | आमदार सोळंके पुत्राच्या केदारेश्वर नगरीच्या रस्त्यासाठी ग्रामपंचायतच्या प्लाॅटवर अतिक्रमण

आमदार सोळंके पुत्राच्या केदारेश्वर नगरीच्या रस्त्यासाठी ग्रामपंचायतच्या प्लाॅटवर अतिक्रमण

googlenewsNext

माजलगाव (बीड) : शहरानजिक असलेल्या देवखेडा या पुनर्वसित गावात आ. प्रकाश सोळंके यांचे पुत्र व माजी जि.प. सदस्य सुभाष सोळंके यांचे पुत्र यांनी केदारेश्वर नगरी या नावाने चार एकर परिसरात पंचतारांकित भुखंड विकसित केला आहे. या नगरीचे उद्घाटन देखील थामाटात पार पडले. परंतु अल्पावधितच ही नगरी वादाच्या भोवऱ्यात सापडली असून या नगरीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी येथील राजकिय भुमाफियांनी चक्क ग्रामपंचायतच्या विविध प्रयोजनासाठी ठेवलेला भुखंडच अतिक्रमित करुन रस्ता तयार केला आहे. या विरोधात आता गांवकरी मैदानात उतरले असून त्यांनी सदरील अतिक्रमण तात्काळ काढा अन्यथा याच जागेवर आंदोलन करु असा इशारा गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिल्याने भुमाफियांमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान सदरील प्रकारामुळे पंचतारांकित प्लाॅटींगच्या नावाखाली नागरीकांची दिशाभुल करण्याचा प्रकार सुरु असल्याचे बोलल्या जात आहे.

मौजे शेलापुरी येथील नागरीकांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नांदुर ता. माजलगांव येथील प्लाॅट क्र. 1 आहे. यामध्ये कांही दिवसांपूर्वी ग्रा.पं. ने ठराव घेवून पुनंदगांव येथील केदारेश्वर मंदीर येथे जाण्यासाठी ठराव घेवून रस्ता ठेवण्यात आला होता. परंतु तो ठराव नियमबाहय होता त्यास कसल्याही प्रकारची परवानगी नव्हती. त्यामुळे तो ठराव रद्द करावयास पाहिजे होता. परंतु मंदीराकडे जाण्यासाठीचा रस्ता असल्यामुळे त्याबाबत कोणीही विरोध केला नाही. आता प्लाॅटींग धारकाने मंदीराकडे जाण्यासाठीचा रस्ता स्वतःच्या प्लाॅटींगसाठी अतिक्रमित करुन प्लाॅटींगला जाण्याकरीता सिमेंट रस्ता बनवुन पक्के अतिक्रमण केले आहे.

सदरील प्लाॅटींग ही येथील आमदार प्रकाश सोळंके यांचे पुत्र विरेंद्र सोळंके व माजी जि.प. सदस्य सुभाष सोळंके यांचे पुत्र सुहास सोळंके यांनी विकसित केली आहे. मात्र गांवक-यांनी या प्लाॅटींगच्या रस्त्यासाठी नांदुर ग्रा.पं. चा प्लाॅट अतिक्रमित केल्याची तक्रार दिल्यामुळे ही पंचतारांकित प्लाॅटींग वादाच्या भोव-यात सापडली असून या प्लाॅटींगमध्ये जाण्यासाठी रस्ताच नसल्याचे या तक्रारीवरुन दिसून येत आहे. या प्रकारामुळे या ठिकाणी होणारी खरेदी विक्री यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच रस्ताच नसेल मग जायचे यायचे कोठून असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

गटविकास अधिकारी यांनी दिले चौकशीचे आदेश
या प्रकरणात गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर प्रचलित कायदे, नियम व अद्यावत शासन निर्णय व परिपत्रके यांचे अवलोकन तसेच न्यायालयीन प्रक्रिया इत्यादीची माहिती घेवून उचित कार्यवाही अवलंबून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी प्रज्ञा माने यांनी दिले आहेत.

आमच्या प्लॉटिंगमध्ये आलेला सदरील रस्ता हा केदारेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता होता. परंतु परिसरातील नागरिकांच्या त्रासामुळे आम्ही रस्ता बंद करून तो आमच्या प्लॉटिंग पुरताच ठेवला आहे. 
- सुहास सोळंके ,प्लाॅट विक्रेते

Web Title: Encroachment on Gram Panchayat plot of MLA Prakash Solanke's son for Kedareshwar Nagari road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.