माजलगावात अतिक्रमणे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:12 AM2021-09-02T05:12:16+5:302021-09-02T05:12:16+5:30
माजलगाव : नगर परिषद प्रशासनाने पोलीस संरक्षणात मेन रोडवरील टपाल कार्यालयासमोरची अतिक्रमणे गेल्या आठवड्यात हटविली होती. बुधवारी पुन्हा याच ...
माजलगाव : नगर परिषद प्रशासनाने पोलीस संरक्षणात मेन रोडवरील टपाल कार्यालयासमोरची अतिक्रमणे गेल्या आठवड्यात हटविली होती. बुधवारी पुन्हा याच रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास नगर परिषदेने सुरुवात केली. या मोहिमेमुळे मेन रोडने मोकळा श्वास घेतला असून, अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम चालूच ठेवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील मेन रोडवर टपाल कार्यालयाला अनेक दिवसांपासून अतिक्रमणाने घेरले होते. त्यात याच रस्त्यावर नगर परिषदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर वर्दळ वाढली. दिवसेंदिवस अतिक्रमण वाढल्याने या रस्त्याने ये-जा करण्यासही अडचण निर्माण होत होती. गावठाणातील रस्ता अगोदरच अरुंद होता. त्यात आता अतिक्रमणांची भर पडलेली आहे. तसेच या रस्त्यावर भाजीपाला विकेत्यांच्या हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम हाेता. या रस्त्यावर टपाल कार्यालय, स्टेट बँक असल्याने या रस्त्यावरून ये - जा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. अनेकदा हातगाडीवाले आणि पादचाऱ्यांमध्ये वादही झाले आहेत.
दरम्यान, बुधवारी सकाळी नगर परिषद प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविले. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. तसेच येथील रहदारीदेखील सुरळीत झाली. ही कारवाई मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न. प. कर्मचारी गणेश डोंगरे, प्रकाश शिंदे, शेख बाबर, शेख बाबा यांच्यासह पोलीस कर्मचारी बाळासाहेब आनवणे, चालक श्रीमंत पवार, पो. ना. बाबुराव पवार, सह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
010921\purusttam karva_img-20210901-wa0018_14.jpg~010921\purusttam karva_img-20210901-wa0017_14.jpg