अंबाजोगाईत चाळीस वर्षांपासूनच्या वस्तीवर अखेर महामार्गाचा ‘बुलडोझर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:20 AM2018-04-11T01:20:22+5:302018-04-11T01:20:22+5:30
शेतात काम करूनही भागेना,म्हणुन गांव सोडुन कारखान्याच्या परिसरात वास्तव्य केलं. उपजीविका भागविण्यासाठी कोणी या रस्त्यावर हॉटेल टाकली, कोणी गाड्यांचे पंक्चर काढु लागले. कोणी टपऱ्या, कोणी दुकाने थाटली. चाळीस वर्षे या जागेत काढली. मात्र महामार्गाच्या कामात अडसर ठरणाºया या वस्तीवर अखेर मंगळवारी सकाळी बुलडोजर फिरले.अन् सगळं कसं होत्याचं नव्हतं झालं
अविनाश मुडेगावकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : शेतात काम करूनही भागेना,म्हणुन गांव सोडुन कारखान्याच्या परिसरात वास्तव्य केलं. उपजीविका भागविण्यासाठी कोणी या रस्त्यावर हॉटेल टाकली, कोणी गाड्यांचे पंक्चर काढु लागले. कोणी टपऱ्या, कोणी दुकाने थाटली. चाळीस वर्षे या जागेत काढली. मात्र महामार्गाच्या कामात अडसर ठरणाºया या वस्तीवर अखेर मंगळवारी सकाळी बुलडोजर फिरले.अन् सगळं कसं होत्याचं नव्हतं झालं
अंबाजोगाईपासून सहा कि.मी.अंतरावर चाळीस वर्षापुर्वी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली. रोजगार निर्मिती करणार हा प्रकल्प ठरला. अनेकांना कारखान्यात काम मिळाले. ज्यांना शेती नाही, गावात मजुरी नाही अशा अनेक कुटुंबियानी कारखान्याच्या मोकळया परिसरात वास्तव्य केले. उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झालेल्या कुटुंबियांनी विविध छोटे छोटे व्यवसाय सुरु केले. या माध्यमातून जवळपास १५० कुटुंबियांना व्यवसाय मिळाला. त्यांची रोजीरोटी व्यविस्थत सुरु झाली. दूसरी पिढीदेखील हाच व्यवसाय जोपासू लागली. व्यवसायात प्रगती होत गेल्याने शेडची जागा पक्या घरांनी घेतली. नंतर इथे मोठी वस्तीच निर्माण झाली. साखर कारखाना सुरु झाला तेव्हा ही वस्ती मुख्य रस्त्यापासून दूर होती.
कालांतराने रस्ते रुंद झाले. तसतशी वस्ती रस्त्यालगत आली. दरम्यान याच परिसरात महामार्गाच्या कामाला सुरु वात झाली. संपूर्ण वस्तीच अतिक्रमणात आली होती. मंगळवारी मात्र अतिक्रमण हटाव मोहिमेत सारं उजाड झालं.
सार्वजनिक बांधकाम, महसूल विभागाची कारवाई
सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभागाचे दोन पथक आणि पोलिसांची एक तुकडी यांनी सकाळी आठ वाजेपासून सायंकाळपर्यंत संयुक्तपणे ही मोहीम राबविली. चाळीस वर्षाचे वास्तव्य असलेल्या या वस्तीवर मंगळवारी बुलडोझर फिरले, अन सगळं भुईसपाट झालं. अनेकांचे व्यवसाय थांबले. अनेकजण बेघर झाले. आता जायचे कुठे अन् करायचे काय? हा प्रश्न मात्र अनेकांच्या व्यथा निर्माण करणारा ठरला आहे.