अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा डेंग्यूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:37 AM2021-08-21T04:37:58+5:302021-08-21T04:37:58+5:30
धारूर : येथील अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या ओम जगताप या विद्यार्थ्याचे डेंग्यूच्या आजारावर उपचार सुरू असताना मृत्यू ...
धारूर : येथील अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या ओम जगताप या विद्यार्थ्याचे डेंग्यूच्या आजारावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
धारूर शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू आजाराची साथ सुरू आहे. कसबा विभागात डेंग्यूचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. डेंग्यूमुळे यापूर्वीही या भागात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच भागात राहणारे ओम बाबासाहेब जगताप (वय १९) या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस मंगळवारी डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना प्रकृती खालावल्याने त्यास अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली. ओम हा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील ऑपरेटर बाबासाहेब उर्फ नाना जगताप यांचा मुलगा होत. अतिशय शिस्तप्रिय, अभ्यासू, शांत व संयमी स्वभावामुळे ओमची वेगळी ओळख होती. शुक्रवारी सकाळी ९ वाजता धारूर येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
200821\img_20210820_114452.jpg
ओम जगताप डेंग्यू ने मृत्यू