आशीर्वाद वृक्ष उपक्रमातून पर्यावरण संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:34 AM2021-09-03T04:34:57+5:302021-09-03T04:34:57+5:30
विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे शिरूर कासार तालुक्यात वृक्षारोपण शिरूर कासार : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षणासाठी आधार देण्यासह ...
विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे शिरूर कासार तालुक्यात वृक्षारोपण
शिरूर कासार : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षणासाठी आधार देण्यासह झाडे लावून परिसर हिरवागार करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या विद्यार्थी सहायक समिती व माजी विद्यार्थ्यांमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘आशीर्वाद वृक्ष’ उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धन होत आहेच; शिवाय लोकांमध्ये झाडांबद्दल आपुलकीची भावना निर्माण होत असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी जमीर शेख यांनी केले.
विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या आशीर्वाद वृक्ष उपक्रमात दात्यांच्या मदतीने संरक्षक जाळी करण्यात आली. या वेळी शिरूर कासार पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश बढे, वारणी गावचे उपसरपंच ज्ञानदेव केदार, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन दिलीप जायभाये, केंद्रप्रमुख शिवाजी भोंडवे, मुख्याध्यापक परशुराम खेडकर, मुख्याध्यापक राजेंद्र केदार, माजी विद्यार्थी मंडळाचे सदस्य जीवराज चोले, समितीचे माजी विद्यार्थी व शिरूर कासार येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन जायभाये, काशिनाथ जगताप यांच्यासह इतर अधिकारी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. आशीर्वाद वृक्षांचे पालकत्व घेतलेले समितीचे माजी विद्यार्थी वैभव राऊत, सपना नागरगोजे, राहुल सातपुते, देवीचंद आंधळे, प्रतीक भंडारे, ओंकार भांडेकर, सचिन पोकळे, जीवराज चोले, सुनील चौरे उपस्थित होते.
आष्टी आणि शिरूर कासार तालुक्यातील अनेक विद्यार्थी समितीमध्ये राहून शिकले. समितीने दिलेल्या संस्कारांमुळेच आज आम्ही सर्व विद्यार्थी आशीर्वाद वृक्ष लावत आहोत. शुद्ध हवा, सावली आणि फळे मिळावीत, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी समिती एखाद्या वृक्षाप्रमाणे आधार देते. या भागातील विद्यार्थ्यांना कोणतीही मदत आम्ही करत राहू. शाळांमधून वृक्षारोपणाची जागृती झाली, तर भविष्यात आपला परिसर हिरवागार होईल, असे प्रा. सचिन जायभाये यांनी सांगितले. प्रशांत खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार खाडे यांनी मानले.
010921\2231img-20210901-wa0050.jpg
आशिर्वाद वृक्ष लागवड वेळी गटशिक्षणाधिकारी जमीर शेख सह प्रथा सचिन जायभाये व अन्य