वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:38 AM2021-08-13T04:38:20+5:302021-08-13T04:38:20+5:30
शहरातील बँकांमध्ये गर्दी कायम बीड : शहरात राष्ट्रीयीकृत बँका व खासगी बँका यांची संख्या मोठी आहे. शहरातील बँकांमध्ये पैसे ...
शहरातील बँकांमध्ये गर्दी कायम
बीड : शहरात राष्ट्रीयीकृत बँका व खासगी बँका यांची संख्या मोठी आहे. शहरातील बँकांमध्ये पैसे भरणे, पैसे काढणे व विविध बँकांच्या कामकाजासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बँक प्रशासनाकडून कुठल्याही ठोस उपाययोजना आखल्या जात नाहीत. याशिवाय बँकेत कोरोनाविषयी अत्यावश्यक असणारे सॅनिटायझर व सामाजिक अंतराचा वापर याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. या दुर्लक्षामुळे भविष्यात कोरोनाचा धोका वाढतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
प्रवेशद्वारावरच वाहनांची पार्किंग
बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डाच्या प्रवेशद्वारावरच वाहनांची पार्किंग केली जात आहे. आतमध्येही पाठीमागे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दुचाकी आडव्यातिडव्या उभ्या असतात. त्यामुळे यातून मार्ग काढताना सामान्यांसह रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. ही वाहने पार्क करण्यासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करावी, अशी मागणी आहे. परंतु, याकडे अद्यापही दुर्लक्षच केले जात आहे.
शौचालयांची होईना वेळेवर स्वच्छता
बीड : शहरात ठिकठिकाणी शौचालये आणि मुताऱ्या तयार करण्यात आलेल्या आहेत. कोरोनासारख्या संसर्गजन्य आजार पाहता हे सर्व वेळेवर स्वच्छ करणे गरजेचे आहे. परंतु, नगरपालिकेकडून महिनाभर याकडे लक्षच दिले जात नसल्याचा आरोप सामान्यांमधून होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुताऱ्या, शौचालये, नियमित स्वच्छ करण्याची मागणी होत आहे. परंतु, अद्यापही या मागणीकडे दुर्लक्षचे केले जात आहे.
‘नो मास्क नो एंट्री’चा पडला विसर
अंबाजोगाई : विना मास्क प्रवाशांनाही अॅटो रिक्षामध्ये प्रवेश दिला जात आहे. पूर्वी मास्क असल्याशिवाय रिक्षाचालक प्रवाशांना अथवा ग्राहकांना रिक्षात बसू देत नव्हते. मात्र, आता बेफिकिरी वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जोमाने असतानाही पुन्हा नो मास्क नो एंट्री ही मोहीम सुरू करून ग्राहकांना मास्कची सक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
रेशन दुकानांमध्ये दरपत्रकाचा अभाव
अंबाजोगाई : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये दर्शनी भागात अनेक दुकानदारांनी धान्याचे दरपत्रक लावलेले नाहीत. तसेच अनेक दुकानांमध्ये तक्रार पेटीदेखील ठेवण्यात आली नाही. त्यामुळे रेशन धान्याचा उपलब्ध साठा व शासकीय किमती याची माहिती ग्राहकांना उपलब्ध होत नाही. रेशन दुकानदारांनी दर्शनी भागात दरपत्रकाचा फलक लावावा, असा नियम असतानाही हा नियम पाळला जात नाही.