अरे वा ! कोरोनानंतर घटले साथरोगाचे रुग्ण; उपाययोजनांचा डोस आला कामी

By सोमनाथ खताळ | Published: September 22, 2024 12:04 PM2024-09-22T12:04:57+5:302024-09-22T12:05:14+5:30

डेंग्यू ९८ तर मलेरियाच्या रुग्णसंख्येत १७ टक्के घट : आरोग्य विभागाचा दावा; प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाचा झाला फायदा

Epidemic patients decreased after Corona A dose of measures worked | अरे वा ! कोरोनानंतर घटले साथरोगाचे रुग्ण; उपाययोजनांचा डोस आला कामी

अरे वा ! कोरोनानंतर घटले साथरोगाचे रुग्ण; उपाययोजनांचा डोस आला कामी

बीड: कोरोना महामारीनंतर राज्यात साथरोगांच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली. यामध्ये २०२३ च्या तुलनेत डेंग्यू ९८ तर मलेरियाच्या रुग्णसंख्येत १७ टक्के घट आहे. उपाययोजनांमुळे घट झाल्याचे साथरोगाचे सहसंचालक डॉ. आर. बी. पवार यांनी सांगितले. साथरोग नियंत्रणासाठी राज्यासाठी एक व प्रत्येक जिल्ह्यात एक असे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते. तसेच कोरोनानंतर केलेल्या उपाययोजनांमुळे साथरोगाचा टक्का घसरल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. रुग्णसंख्येसोबतच मृत्यूही घटले आहेत.

उच्चस्तरीय तांत्रिक समिती तयार करणे, कंट्रोल रूम, शीघ्र पथक स्थापन करण्यासह नियमित आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना तयार केल्याने साथरोग रुग्णसंख्येत घट झाली आहे.
–डॉ. आर. बी. पवार, सहसंचालक (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग विभाग)

अशी झाली घट

    कोरोना    ९७.५२    ९९.६२  
    इन्फ्लुएंझा/स्वाइन फ्लू    ६६.८६    ५६.४६    
    स्क्रब टायफस    ८९.२५    ९७.३९  
    कॉलरा    ९९.५५    ६०.४१    
    अतिसार    ४९.६६    ४९.२३ 
    २०२३ २०२४   (आकडे टक्केवारीमध्ये)
 

Web Title: Epidemic patients decreased after Corona A dose of measures worked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.