वाळू चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:36 AM2021-09-25T04:36:52+5:302021-09-25T04:36:52+5:30

तुकाराम कचरुबा आव्हाड (३४, रा. नित्रूड, ता. माजलगाव) असे त्या आरोपीचे नाव आहे. तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ ...

Escape of the accused in the crime of sand theft | वाळू चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचे पलायन

वाळू चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचे पलायन

Next

तुकाराम कचरुबा आव्हाड (३४, रा. नित्रूड, ता. माजलगाव) असे त्या आरोपीचे नाव आहे. तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ सप्टेंबर रोजी अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला होता. चालक तुुकाराम आव्हाडला अटक केली होती. हवालदार नारायण श्रीकृष्ण काकडे हे आरोपी तुकाराम आव्हाडला घेऊन २३ सप्टेंबर रोजी गेवराई येथील न्यायालयात हजर करण्यास गेले होते. मात्र, न्यायालय आवारात आव्हाडने हिसका देत पळ काढला. हवालदार काकडे यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो पसार होण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी काकडे यांच्या तक्रारीवरून त्याच्यावर गेवराई ठाण्यात कलम २२४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

दरम्यान, पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या आरोपीचा शोध सुरू असून निष्काळजी करणाऱ्या हवालदाराचा कसुरी अहवाल वरिष्ठांना पाठविणार असल्याचे उपाधीक्षक स्वप्नील राठोड यांनी सांगितले.

....

Web Title: Escape of the accused in the crime of sand theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.