मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईत स्थापन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:38 AM2021-03-01T04:38:00+5:302021-03-01T04:38:00+5:30
अंबाजोगाई : २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अंबाजोगाई येथे मराठी भाषेचे विद्यापीठ करण्यात यावे या मागणीचे ...
अंबाजोगाई : २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अंबाजोगाई येथे मराठी भाषेचे विद्यापीठ करण्यात यावे या मागणीचे पत्र उपजिल्हाधिकारी यांना युवासेना विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी दिले आहे.
अंबाजोगाई शहर हे मराठवाड्याचे शांतीचे प्रतीक व मराठी संतांची मायभूमी म्हणून ओळखले जाते.
मराठी भाषेचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी महाराज, दासोपंत स्वामी महाराज यांच्या पवित्र पावन स्मृती या अंबाजोगाई शहरात असल्याने या शहराच्या वैभवात भर पडलेली आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने मराठी भाषेचे विद्यापीठ हे अंबाजोगाई शहराच्या धर्तीवरच करण्यात यावे, अशी मागणी अक्षय भुमकर हे गेल्या तीन-चार वर्षांपासून सतत २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनी प्रशासकीय अधिकारी, मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करत आहेत. संपूर्ण अंबाजोगाईकरांच्या वतीने अंबाजोगाई येथे मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे, याकरिता अक्षय भुमकर यांनी शनिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे या मागणीचे निवेदन सादर केले आहे.