महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी बचत गट स्थापन करा - सारिका क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:36 AM2021-02-09T04:36:01+5:302021-02-09T04:36:01+5:30
या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी पूजा वाघमारे, उद्घाटक डॉ.सारिका क्षीरसागर, प्रमुख मार्गदर्शक, प्रा. सुशिला मोराळे, प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपनिरीक्षक मीना ...
या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी पूजा वाघमारे, उद्घाटक डॉ.सारिका क्षीरसागर, प्रमुख मार्गदर्शक, प्रा. सुशिला मोराळे, प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे, स्मिता वाघमारे, प्रेमलता चांदणे, ॲड. सुजाता मोराळे आदींची उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्या मीना तुपे यांनी महिलांनी रमाईचे अनुकरण करुन संसाराचा आधारवड बनायला पाहिजे असे भाषणात सांगितले. डॉ.सारिका क्षीरसागर यांनी महिलांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे यासाठी. मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी महिला बचत गट तयार करा असे सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक प्रा.सुशिला मोराळे यांनी माता रमाई यांच्या जीवनावर आधारित गीत गायन करून प्रबोधन केले. यावेळी यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे रमाईचा आधार होता. त्या माता माउलीचा सर्व महिलांनी आदर्श घेऊन आपल्या मुलांना घडवण्याचा सल्ला दिला.
या कार्यक्रमास विष्णु वाघमारे, राजू जोगदंड, ऋषी वाघमारे, मनोज मस्के, भैय्यासाहेब मोरे, अमोल वाघमारे, नितीन मस्के, उमाजी वाघमारे, बाबासाहेब ओव्हाळ, बाबुराव गालफाडे, समाधान जाधव, सुधाकर वाघमारे, राणोजी निकाळजे, प्रा. टी.जी.कांबळे, प्रा. बिभीषण सिरसाठ, योगेश जावळे, आश्रुबा शिंदे, सुनिल कांबळे, मधुकर गायकवाड, पंडित सोनवणे, राहुल साळवे यांच्यासह महिला - पुरुष उपस्थित होते. सूत्रसंचालन बाबासाहेब ओव्हाळ यांनी तर आभार प्रा. बिभीषण सिरसाठ यांनी मानले.