रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर लावला अंदाजपत्रकाचा फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:51 AM2021-02-23T04:51:22+5:302021-02-23T04:51:22+5:30

: क्युरींगचा अभाव ,आठ दिवसात रस्ता वाहतुकीसाठी सुरू माजलगाव: शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट होत आहे. ...

Establishment of budget board after completion of road works | रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर लावला अंदाजपत्रकाचा फलक

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर लावला अंदाजपत्रकाचा फलक

Next

: क्युरींगचा अभाव ,आठ दिवसात रस्ता वाहतुकीसाठी सुरू

माजलगाव: शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट होत आहे. नगराध्यक्षांच्या प्रभागात आठ दिवसांपूर्वी झालेला रस्ता क्युरींग न करताच वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. तर या रस्त्याचे काम सुरू होण्याआधी अंदाजपत्रकाचा फलक लावणे आवश्यक होते. मात्र या रस्त्याचे काम पुर्ण झाल्यावर अंदाजपत्रकाचा फलक लावण्यात आला आहे.

माजलगाव शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ५ कोटी रूपये खर्च करून सिमेंट रस्त्यांची ३८ कामे सुरू आहेत. हे काम करण्यापूर्वी संबंधित गुतेदाराने कामाच्या ठिकाणी अंदाजपत्रकाचा फलक लावणे आवश्यक होते परंतु एकाही ठिकाणी फलक दिसून आला नाही. नगराध्यक्षांच्या प्रभाग ११ मध्ये आठ दिवसांपूर्वी सिमेंट रस्त्यावर क्युरींगसाठी आळे न करता केवळ दोन दिवस पाणी मारून ओलाच रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तर हे पुर्ण झाल्यावर या ठिकाणी अंदाजपत्रकाचा फलक लावण्यात आला.त्या लावलेल्या अंदाजपत्रकावर तो रस्ता कोठून कुठपर्यंत व त्याची किंमत किती हेदेखील लिहिण्यात आलेले नाही. यामुळे संबंधित ठेकेदाराकडून बोगस कामाचा सपाटा सुरू असून यावर नगरपालिकेचे कसलेच नियंत्रण दिसून येत नाही.

दोन वर्षापूर्वी अशाच प्रकारचे कामे झाली होती. त्याची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित गुतेदाराला पुन्हा रस्ते करण्यास भाग पाडले होते.त्याच पध्दतीने या रस्ता कामाची चौकशी करण्याची मागणी नागरीकातून होत आहे.

फोटो : माजलगाव शहरातील प्रभाग ११ मध्ये आठ दिवसात ओला सिमेंट रस्ता असतांना वाहतुकीस खुला करण्यात आला. तर या ठिकाणचे काम पुर्ण झाल्यावर अंदाजपत्रकाचा अर्धवट फलक लावण्यात आला.

===Photopath===

220221\img_20210221_151537_14.jpg~220221\purusttam karva_img-20210220-wa0024_14.jpg

Web Title: Establishment of budget board after completion of road works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.