अंबाजोगाई तालुक्यात ११ शाळांमध्ये इंटरॅक्ट क्लबची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:02 AM2021-02-06T05:02:11+5:302021-02-06T05:02:11+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरातील ११ शाळांमध्ये रोटरी क्लबशी संलग्न असलेल्या इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. ...
अंबाजोगाई :
अंबाजोगाई शहर व परिसरातील ११ शाळांमध्ये रोटरी क्लबशी संलग्न असलेल्या इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. या क्लबच्या माध्यमातून शाळेत व परिसरात शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य, शिक्षण विषयक जनजागृती करण्याचे काम व रोटरी संबधित सर्व प्रकल्प राबविण्याचे कार्य करणार आहेत.
शहरी भागातील ८ व ग्रामीण भागातील ३ शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत.
योगेश्वरी नूतन विद्यालय.
न्यू व्हिजन पब्लिक स्कूल, श्री खोलेश्वर विद्यालय, कै. गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या विद्यालय, कै. वसंतराव काळे पब्लिक स्कूल, सिनर्जी नॅशनल स्कूल,
न्यू इंग्लिश स्कूल,
सेंट अँथोनी इंग्लिश स्कूल,
कै. वसंतराव नाईक विद्यालय वरवटी,
गुरुदेव विद्यालय मोरेवाडी, सांडेश्वर विद्यालय चनई या शाळांमध्ये शाळानिहाय अध्यक्ष व सचिवांची निवड करण्यात आली. नवीन पदाधिकारी व पालक शिक्षकांचा अध्यक्ष डॉ. निशिकांत पाचेगावकर व सचिव कल्याण काळे यांच्या उपस्थितीमध्ये पदग्रहण सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रवीण चोकडा, अजित देशमुख, सचिन बेंबडे, मोईन शेख, रोहिणी पाठक, रुपेश रामावत, गोरखबापू मुंडे, जगदीश जाजू, संतोष मोहिते, अमृत महाजन उपस्थित होते. इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक चळवळ राबवून विद्यार्थ्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती रोटरीचे अध्यक्ष डॉ. निशिकांत पाचेगावकर यांनी दिली.