पुरस्कारामुळे आपल्या कामाचे मूल्यमापन : प्रसाद चिक्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:28+5:302021-07-19T04:22:28+5:30

अंबाजोगाई : पुरस्कार हे आपल्या कामाचे मूल्यमापन करण्याचे काम करतात, असे मत ज्ञानप्रबोधिनीचे कार्यकर्ते प्रल्हाद चिक्षे यांनी व्यक्त केले. ...

Evaluation of your work due to award: Prasad Chikshe | पुरस्कारामुळे आपल्या कामाचे मूल्यमापन : प्रसाद चिक्षे

पुरस्कारामुळे आपल्या कामाचे मूल्यमापन : प्रसाद चिक्षे

Next

अंबाजोगाई : पुरस्कार हे आपल्या कामाचे मूल्यमापन करण्याचे काम करतात, असे मत ज्ञानप्रबोधिनीचे कार्यकर्ते प्रल्हाद चिक्षे यांनी व्यक्त केले. अंबाजोगाई रोटरी क्लबच्या वतीने देण्यात येणारा "रोटरी भूषण पुरस्कार" स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना प्रसाद चिक्षे बोलत होते.

प्रसाद चिक्षे पुढे म्हणाले की, सार्वजनिक जीवनात काम करताना बऱ्याच वेळा कार्यकर्ते अहंकाराने प्रभावित झाल्याचे पाहायला मिळतात. अशा कार्यकर्त्याला एखादा पुरस्कार मिळाला तर तो त्या कार्यकर्त्याला आपल्या कामाचा आरसा दाखविण्याचे काम करतो, असे माझे मत असल्याचे यावेळी त्यांनी व्यक्त केले

प्रारंभी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल डॉ .ओमप्रकाश मोतीपवळे, कविता मोतीपवळे, उपप्रांतपाल दादासाहेब जमाले पाटील, साधना जमालेपाटील, प्रसाद चिक्षे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर मावळते अध्यक्ष डॉ. निशिकांत पाचेगावकर, सचिव कल्याण काळे, नूतन अध्यक्ष विवेक गंगणे, सचिव रोहिणी पाठक यांची उपस्थिती होती .

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चिक्षे यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र देऊन रोटरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पदग्रहण समारंभात रोटरीचे मावळते अध्यक्ष डॉ . निशिकांत पाचेगावकर यांनी नवीन अध्यक्ष विवेक गंगणे यांना पदभार सोपविला, तर रोटरीचे मावळते सचिव कल्याण काळे यांनी नवीन सचिव प्रा. रोहिणी पाठक यांना पदभार सोपविला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते "सहयोग" या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपवळे, दादासाहेब जमाले पाटील, विवेक गंगणे, प्रसाद चिक्षे, प्रा. रमेश सोनवळकर, अमृत महाजन, डॉ. निशिकांत पाचेगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन कराड यांनी केले. शेवटी नवनिर्वाचित सचिव प्रा. रोहिणी पाठक यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी प्रा. दामोधर थोरात, जगदीश जाजू, शेख मोईन, भागवत कांबळे, सुहास काटे, बाबूराव बाभूळगावकर, संतोष मोहिते, ॲड. अनंत जगतकर, आनंद कर्नावट, विश्वनाथ लहाने, नंदकिशोर मुंदडा, अनिकेत लोहिया, डॉ. राजेश इंगोले, डॉ . नवनाथ घुगे, डॉ . श्रीनिवास रेड्डी, धनराज सोळंकी, डॉ .कल्पना मुळावकर, गोरख मुंडे, मनोज लखेरा, गणेश राऊत, ललित बजाज, आनंद जाजू, रूपेश रामावत , स्वप्निल परदेशी, भीमाशंकर शिंदे, अनिरुद्ध चौसाळकर, सचिन बेंबडे, गोपाळ पारीख, बालासाहेब कदम, राम सारडा, राधेशाम लोहिया, प्रदीप झरकर, अभिजित जोंधळे, आनंद टाकळकर, राजू रांदड, मंदाकिनी गित्ते, स्वरूपा कुलकर्णी, संजय देशपांडे, हर्षवर्धन वडमारे, ॲड. संतोष पवार, संजय बोरा, प्रशांत आदनाक, सुवर्णा गंगणे, अंजली चरखा, मेघना मोहिते उपस्थित होते .

180721\img-20210716-wa0117.jpg

प्रसाद चिक्षे यांना रोटरी भूषण पुरस्काराने सन्मानित करताना मान्यवर

Web Title: Evaluation of your work due to award: Prasad Chikshe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.