७० किलो गांजा पडकून ३ दिवस उलटूनही आरोपी मोकाट 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 06:13 PM2022-12-12T18:13:17+5:302022-12-12T18:13:25+5:30

आष्टी तालुक्यातील बाळेवाडी येथील शिवारात पोलिसांनी केली होती कारवाई

Even after 3 days after 70 kg of ganja case accused is not arrested | ७० किलो गांजा पडकून ३ दिवस उलटूनही आरोपी मोकाट 

७० किलो गांजा पडकून ३ दिवस उलटूनही आरोपी मोकाट 

Next

- अविनाश कदम 
आष्टी ( बीड):
बीड-आष्टी-नगर राष्ट्रीय महामार्गापासून आठ किलोमीटर अंतरावर कपासीच्या पिकातून १०० गांजाची झाडांची पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी जप्त केली. मात्र, तीन दिवस उलटूनही यातील आरोपी पोलिसांना सापडले नाहीत. 

आष्टी तालुक्यातील बाळेवाडी येथील हनुमंत अर्जुन पठारे याने स्वतःच्या शेतात कपाशीमध्ये गांजाची झाडे लावल्याची गोपनीय माहिती बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली. यावरून पोलिसांनी धाड टाकत शेतातून ७० किलो वजनाची १०० गांजाची झाडे जप्त केली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे याच्या फिर्यादीवरून आरोपी हनुमंत अर्जुन पठारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, ३ दिवस उलटूनही अंभोरा पोलीसांना या प्रकरणातील आरोपी सापडला नाही. याबाबत पोलिस उपविभागीय अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, पोलिसांचा शोध सुरु असून लवकरच आरोपी ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती दिली. 
 

Web Title: Even after 3 days after 70 kg of ganja case accused is not arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.