कारवाई झाल्यानंतरही वाहनधारकांनी थकवला ९५ लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:30 AM2021-02-15T04:30:16+5:302021-02-15T04:30:16+5:30

बीड : शहरात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांना ऑनलाईन दंड आकारणी केली जात आहे. मात्र, अनेकजण वाहतुकीचे नियम देखील ...

Even after the action was taken, the vehicle owners paid a fine of Rs 95 lakh | कारवाई झाल्यानंतरही वाहनधारकांनी थकवला ९५ लाखाचा दंड

कारवाई झाल्यानंतरही वाहनधारकांनी थकवला ९५ लाखाचा दंड

Next

बीड : शहरात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांना ऑनलाईन दंड आकारणी केली जात आहे. मात्र, अनेकजण वाहतुकीचे नियम देखील पाळत नाहीत, आणि वाहनांवरील दंड देखील भरलेला नाही. अशा नियम मोडणाऱ्यांनी ९५ लाखाचा दंड थकवला आहे. तर, वाहतूक पोलिसांनी ७६ लाख रुपये दंड आकारणी केली आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये वाहन पार्किंग करू नये अशा सूचना दिलेल्या आहेत. मात्र, अनेकवेळा वाहने अस्ताव्यस्त उभी करून खरेदीसाठी नागरिक जातात, त्यावेळी वाहतूक पोलिसांकडून त्या वाहनाच्या क्रमांकावरून ऑनलाईन दंड आकारणी केली जाते. त्याचा संदेश संबंधित वाहनचालकाच्या मोबाईलवर जातो. मात्र, तरी देखील तो दंड अनेकजण थकीत ठेवतात त्यानंतर जर ते वाहन वाहतूक पोलिसांनी तपासले तर, त्या कारवाईचा दंड भरलेला नसल्याचे दिसून येते. तो दंड भरला नाही तर, तो बोजा कायम वाहनावर राहतो. त्यामुळे हा दंड भरणे गरजेचे आहे.

वाहतुकीचे नियम पाळून नागरिकांनी सुरक्षित प्रवास करावा. नियम न पाळल्यामुळे दंड आकारण्याच्या संदर्भात मोबाईलवर संदेश आला तर, तो दंड तत्काळ भरावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.

२०२० मधील कारवाई ६६ हजार ५३८

दंड १ कोटी ६९ लाख ९५ हजार

नो पार्किंग १२ हजार ६५० दंड २ लाख ५३ हजार

धोकादायक वाहन ४८५ दंड ४ लाख ८५ हजार

विना परवाना २७०० दंड १३ लाख ४५ हजार

ट्रिपल सीट ५२०० केस दंड १० लाख ४४ हजार

मोबाईलवर बोलणे ४६०० केस दंड ९१ लाख ९ हजार ६००

....तर वाहन परवाना होणार अपात्र

दंड न भरल्यास वसुलीसाठी पत्र पाठवले जाते मात्र, तरी देखील दंड न भरल्यास पुढील कार्यवाही म्हणून वाहन परवाना रद्द करण्यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येतो. त्यानुसार परवाना देखील रद्द होऊ शकतो.

प्रतिक्रिया

वाहतुकीचे नियम पाळावे, नो पार्किंग किंवा इतर कारणास्तव वाहन चालक त्याठिकाणी दिसून न आल्यास ऑनलाईन दंड आकारला जातो. वसुलीसाठी पत्र पाठवले जाते व मोबाईलवर संदेश देखील येतो, त्यामुळे वाहन चालकाने वाहनांवरील दंड वेळेत भरावा. मोबाईलवर बोलताना कारवाई झाल्यास परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवला जातो. त्यामुळे नियमांचे पालन करावे.

Web Title: Even after the action was taken, the vehicle owners paid a fine of Rs 95 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.