नोटांचे रंग उडाले तरी व्यवहार मात्र पक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:03 AM2021-03-04T05:03:06+5:302021-03-04T05:03:06+5:30

बीड : रिझर्व्ह बँकेने १०, २०, ५०, १००, ५०० आणि दोन हजारांच्या विविध रंगी नोटा चलनात आणल्या आहेत. या ...

Even if the color of the notes fades, the transaction is sure | नोटांचे रंग उडाले तरी व्यवहार मात्र पक्का

नोटांचे रंग उडाले तरी व्यवहार मात्र पक्का

Next

बीड : रिझर्व्ह बँकेने १०, २०, ५०, १००, ५०० आणि दोन हजारांच्या विविध रंगी नोटा चलनात आणल्या आहेत. या नोटांचा वापरही लोक करत आहेत. नोटांच्या कागदाचा दर्जा पाहता वारंवार हाताळणीत त्यांचा रंग धूसर होताना दिसतोय. नोटांचे रंग उडत असतानाही त्याआधारे होणारे लहान-मोठे व्यवहार मात्र पक्के होत आहेत. रंग उडाल्याबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नागरिकांतून अद्याप बँकांकडे आलेल्या नाहीत.

व्यवहारातून ग्राहकांनी बँकांमध्ये जमा केलेल्या नोटांमध्ये बहुतांश नोटा चांगल्याच असतात. परंतु, काही नोटा वापरताना ग्राहक गांभीर्याने घेत नसल्याने त्यावरील रंग धूसर होणे, गुड्या (घडी) पडणे, अस्वच्छ होण्याचे प्रमाण बाजारात पहायला मिळते. मात्र, ती नोट दहाची, पन्नासची किंवा तिच्या रंगानुसार मूल्य समजून विनातक्रार व्यवहार होत आहेत.

साॅइल नोटा वेगळ्या करण्याचे काम दररोज होते. फाटलेल्या तसेच जीर्ण नोटांचे प्रमाण १० टक्के इतके असल्याचे सूत्र सांगतात. मात्र, नोटांचा रंग उडाल्याच्या तक्रारीच नाहीत, असे विविध बँकांच्या अधिकाऱ्यांशी विचारणा केल्यानंतर सांगण्यात आले.

----------

नोट सॉर्टिंग यंत्र

बँकांमध्ये जमा होणाऱ्या नोटांची तीन गटांत विभागणी करणारे यंत्र वापरात आहे. एटीएमसाठी उपयोगात आणता येतील अशा नोटा, सॉइल नोटा आणि व्यवहारात साधारणत: वापरात आणता येतील, अशा नोटांची विभागणी हे यंत्र करते. नकली नोटादेखील हे यंत्र वेगळे करते.

----------

सॉइल नोटांबाबत रिझर्व्ह बँकेला कळविल्यानंतर निर्देशानुसार त्या बदलून मिळतात. सॉइल नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा होण्यापासून त्याबाबतची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत बफर स्टॉकमधील नोटा वापरात आणल्या जातात, त्यामुळे टंचाई अथवा पैसे अडकून राहिल्याच्या तक्रारीही कोणत्याच बँकेकडून होत नाही.

----

दहा, पन्नास, दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटांचा व्यवहारात वापर वाढला आहे. यातील पाचशे व दोनशेच्या नोटांची चमक गेल्यासारखे जाणवते; मात्र ती खरी आहे, याची खात्री करून नोटेच्या इतर बाबीकडे किंचितसे दुर्लक्ष करून व्यवहारात ग्राहक आणि विक्रेता दोन्ही बाजूंकडून स्वीकारली जाते. अशा नोटांचे प्रमाण दोन टक्क्यांच्या आत आहे.

-----

नोटा हाताळण्याबाबत निष्काळजीपणा टाळला तर त्या चांगल्या स्थितीत राहू शकतात. रंग उडण्याचे, धूसर होण्याचे किंवा फाटण्याचे प्रकार निष्काळजीपणामुळेच घडतात. मात्र, अलीकडच्या काळात नोटा हाताळण्याबाबत लोक सजग होत आहेत. घडी घालून ठेवणे, नाव, मेसेज लिहिण्याचे प्रमाण कमी झाल्याचे बँक अधिकारी सांगतात.

---------

सरकार कॅशलेस इकॉनॉमीचा प्रचार करते. परंतु ऑनलाइन व्यवहार न करता लोक अजूनही नोटा हाताळून व्यवहार करीत असल्याने नोटांचा दर्जा खालावत आहे. ऑनलाइन व्यवहार वाढले तर नोटांबाबत तक्रारी कमी होऊ शकतात. परंतु ऑनलाइन व्यवहारांसाठी सरकारने ग्राहकाला सुरक्षेबाबत खात्री देण्याची गरज आहे.

----------

नोटांचा रंग उडत असल्याबाबत अद्यापपर्यंत तक्रारी नाहीत. नागरिकांनी नोटांवर लिहू नये. तेल व पाण्यापसून दूर ठेवाव्यात, धूळ लागणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. लक्ष्मी समजून नोट हाताळायला हवी. सॉइल नोटा बँकांमार्फत आल्यानंतर त्या रिझर्व्ह बँकेकडे जमा होतात. नोटेच्या स्वरूप व स्थितीवरून त्याचे मूल्य काढले जाते.

- श्रीधर कदम, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक.

---------

Web Title: Even if the color of the notes fades, the transaction is sure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.