शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल होऊ शकतो चोरीचा गुन्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:40 AM2021-09-04T04:40:14+5:302021-09-04T04:40:14+5:30

बीड : जिल्ह्यात शेजाऱ्यांना वीज देण्याचे प्रकार बहुतांश अनेक ठिकाणी आहे; परंतु हा गुन्हा आहे. वीज विक्री करण्याचा अधिकार ...

Even if electricity is taken from a neighbor, theft can be registered! | शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल होऊ शकतो चोरीचा गुन्हा !

शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल होऊ शकतो चोरीचा गुन्हा !

Next

बीड : जिल्ह्यात शेजाऱ्यांना वीज देण्याचे प्रकार बहुतांश अनेक ठिकाणी आहे; परंतु हा गुन्हा आहे. वीज विक्री करण्याचा अधिकार केवळ महावितरणलाच आहे. असे केल्याचे निदर्शनास आल्यास ग्राहकांवर फौजदारी गुन्हा अथवा दंड वसुलीची कारवाई होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी शेजाऱ्यांना वीज देतानाही काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात अगोदरही आणि आताही वीज चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ग्रामीण भागात तर सर्रासपणे आकडे टाकून वीज चोरी केली जात आहे. शहरांमध्ये हा प्रकार स्टँडर्ड आहे. लोक मीटरमध्येच छेडछाड करीत वीज चोरी करत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आलेली आहेत, तसेच काही लोक घरगुती कनेक्शनवर व्यवसाय करतात. काहीजण शेजाऱ्यांना वीज देत असल्याचे दिसून येते. हा प्रकार किरकोळ वाटत असला तरी महावितरणच्या नियमानुसार गुन्हा आहे. ग्राहकांवर फौजदारी गुन्हा अथवा दंड वसुलीची कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज चोरी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

---

नियम काय सांगतो

वीज विक्री करण्याचा अधिकार हा महावितरण व त्याला संलग्नित असलेल्या वितरण कंपनीलाच आहे. इतरांना वीज दिल्याचे निदर्शनास आल्यावर विद्युत अधिनियमाप्रमाणे फौजदारी कारवाई होऊ शकते, तसेच वीज चोरी झाल्याचे समजल्यास वीज कनेक्शन घेतल्यापासून सर्व रक्कम वसूल केली जाऊ शकते.

---

वीज चोरी दाखविणाऱ्यांना बक्षीस बंद

पूर्वी जो व्यक्ती वीज चोरीबाबत महावितरणला माहिती देत होता, त्याला महावितरणकडून बक्षीस दिले जात होते; परंतु आता ही सुविधा बंद झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

---

शेजाऱ्याला वीज दिली तरी गुन्हा आहे. वीज विक्रीचा अधिकार केवळ महावितरण व संबंधित वितरण कंपनीलाच आहे. चोरी निदर्शनास आल्यावर कारवाई केली जाते. सध्या एका भरारी पथकासह संबंधित अभियंता, कर्मचाऱ्यांना कारवाईचे आदेश दिलेले आहेत. हे काम नियमित चालूच असते.

रवींद्र कोळप, अधीक्षक अभियंता, महावितरण.

Web Title: Even if electricity is taken from a neighbor, theft can be registered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.