दहावीच्या परीक्षेतही मुलींची बाजी, बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागात पुन्हा अव्वल

By अनिल भंडारी | Published: May 27, 2024 03:24 PM2024-05-27T15:24:27+5:302024-05-27T15:25:17+5:30

गतवर्षी देखील बीड जिल्हा विभागात अव्वल होता.

Even in the 10th class examination, girls won again in Beed District Chhatrapati Sambhajinagar division | दहावीच्या परीक्षेतही मुलींची बाजी, बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागात पुन्हा अव्वल

दहावीच्या परीक्षेतही मुलींची बाजी, बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागात पुन्हा अव्वल

बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागात अव्वल आला असून बारावीनंतर दहावीच्या परीक्षेतही निकालात मुलींनी बाजी मारली. गतवर्षी बीड जिल्हा विभागात अव्वल होता. त्यामुळे यावेळी लागणाऱ्या निकालाची उत्सुकता होती.

बीड जिल्ह्यातू ४१५७१ मुला- मुलींनी परीक्षा दिली होती. निकालानुसार २३०११ मुले व १७४८३ मुली असे ४०४९४ एकूण विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.८२ तर मुलींचे प्रमाण ९८.१८ टक्के राहिले. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये पाटोदा तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९८.६० इतका लागला आहे. त्या पाठोपाठ आष्टी ९८.८, शिरूर ९८.३८, बीड ९७.८७, वडवणी ९७.७६, केज ९७.४९, गेवराई ९७.२४, परळी ९६.९९, अंबाजोगाई ९६.५०, धारूर ९६.३३, माजलगाव तालुक्याचा निकाल ९६.२३ टक्के लागला.

Web Title: Even in the 10th class examination, girls won again in Beed District Chhatrapati Sambhajinagar division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.