तिसऱ्या दिवशीही पावसाच्या फक्त सरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:36 AM2021-08-22T04:36:12+5:302021-08-22T04:36:12+5:30

.... लग्नात वाजंत्री वाजू लागली शिरूर कासार : जवळपास वर्षांहून अधिक काळ कोरोनाने लग्न समारंभावर मर्यादा आणल्या होत्या. परिणामी ...

Even on the third day, there was only rain | तिसऱ्या दिवशीही पावसाच्या फक्त सरीच

तिसऱ्या दिवशीही पावसाच्या फक्त सरीच

Next

....

लग्नात वाजंत्री वाजू लागली

शिरूर कासार : जवळपास वर्षांहून अधिक काळ कोरोनाने लग्न समारंभावर मर्यादा आणल्या होत्या. परिणामी लग्न हे भातुकलीच्या खेळाप्रमाणे साजरे व्हायचे. ना मंडप, ना स्पिकर. तर नाही वाजंत्री. आताशी कुठे कोरोनाचा वेग मंदावला असल्याने सर्वच क्षेत्रात शिथिलता दिल्याने नवरदेव घोड्यावर बसलेला व पुढे बॅण्ड वाजत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

....

पोळा सणाला पावसाने दिली उर्जितावस्था

शिरूर कासार : शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या बैलांची श्रमपरिहार म्हणून मनोभावे पूजा केली जाते ती पोळ्याच्या सणाला. मात्र हा सण साजरा करताना पाऊस पाणी आणि पीक कशी यावर निर्भर असते. यावर्षी मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने पोळा सणावर चिंतेचे सावट होते. शेतकऱ्यांबरोबर व्यापारी देखील पावसाची वाट पाहत होता. अखेर पावसाचे आगमन झाले आणि पोळा सणाला आता उर्जितावस्था प्राप्त झाल्याचे बोलले जात आहे.

....

ऑनलाईन ज्ञानेश्वरी पारायणाचा समारोप

शिरूर कासार : आळंदी देवाची येथील ज्ञानेश्वरी पारायण फंड आयोजित प्रतिवर्षी फिरत्या पद्धतीने राज्य व राज्याबाहेर तीर्थक्षेत्री ज्ञानेश्वरी पारायण होत असते. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी या पारायण सोहळ्यावर कोरोनाने निर्बंध लावल्याने आयोजित नांदेड येथील हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने करावा लागला. १४ पासून भाविक घरीच पारायणास बसले होते. गुरूवारी या सोहळ्याचा समारोप झाला. पारायण सोहळ्यात सहभागी भाविकांचे भागवताचार्या साध्वी अनुराधा दिदी शेटे, कमल दहातोंडे, विनायक महाराज अष्टेकर यांच्यासह पारायण फंडाचे विश्वस्त श्रीकांत ईटकर, अखिल भारतीय कासार समाज अध्यक्ष शरद भांडेकर, सचिव अरूण वेळापुरे, महारूद्र वीर, शिवाजी काटकर, अनिल शेटे आदींनी स्वागत केले.

....

शिरूमध्ये रक्षाबंधन सणामुळे गर्दी वाढली

शिरूर कासार : रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचे नाते एका प्रेमाच्या धाग्यात घट्ट बांधून ठेवणारा सण. रविवारी हा सण असल्याने मनपसंत राखी खरेदीसाठी बहिणी दुकानावर गर्दी करीत असल्याचे दिसून येत होते. यामुळे बाजारपेठेत इतर खरेदीला देखील उत्साह दिसून होता.

Web Title: Even on the third day, there was only rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.