थॅलेसेमिया, हिमोफिलियाच्या ८८ रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:34 AM2021-01-23T04:34:15+5:302021-01-23T04:34:15+5:30
फोटो बीड : जिल्ह्यात थॅलेसेमिया व हिमोफिलिया रुग्ण वाढत आहेत. त्यांना आळा बसावा, यासाठी बीड जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी मोफत ...
फोटो
बीड : जिल्ह्यात थॅलेसेमिया व हिमोफिलिया रुग्ण वाढत आहेत. त्यांना आळा बसावा, यासाठी बीड जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी मोफत शिबिर घेण्यात आले. यात थॅलेसेमियाच्या ७३ व हिमोफिलियाच्या १५ रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. आता शनिवारी हे शिबिर अंबाजोगाईतील स्वाराती महाविद्यालयात होणार आहे.
स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी विभाग, एनव्हीएचसीपी व एचआयव्ही विभाग जिल्हा रुग्णालय बीड व थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, डॉ. सुखदेव राठोड, आयएमए अध्यक्ष डॉ. अनुराग पांगरीकर, डॉ. राम देशपांडे, डॉ. मंडलेचा, डॉ. जयश्री बांगर, डॉ. तुषार इधाते, डॉ. अर्चना बाहेकर, लक्ष्मीकांत पिंपळगावकर, संगीता दिंडकर, यमुना गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
थॅलेसेमिया हा रक्तातील आनुवंशिक गंभीर आजार रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारची लस अथवा औषध नाही. आजार झाल्यानंतर एक वर्षाच्या आत बालकाला हा आजार असल्याचे लक्षात येते. त्यामुळे जनजागृती हाच यावर एकमेव पर्याय आहे. हाच धागा पकडून बीड व अंबाजोगाई येथे शुक्रवार व शनिवारी मोफत शिबिराचे आयोजन केले आहे. शुक्रवारी बीडमध्ये याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. थॅलेसेमियाच्या ७३ व हिमोफिलियाच्या १५ रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले.