शिक्षण विभागाच्या डोंगर माथ्यावरील मुरु माचे उत्खनन; प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:12 AM2019-07-22T00:12:50+5:302019-07-22T00:12:51+5:30
शहराजवळ असलेल्या शासकीय जमिनीतून रातोरात मुरुम उपसून डोंगरावर अक्षरश: खड्डे करण्यात येत असून, शासनाचा लाखो रुपयांच्या महसूल बुडवला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारुर : शहराजवळ असलेल्या शासकीय जमिनीतून रातोरात मुरुम उपसून डोंगरावर अक्षरश: खड्डे करण्यात येत असून, शासनाचा लाखो रुपयांच्या महसूल बुडवला जात आहे. डोंगरमाथ्याचे विद्रुपीकरण सुरु आहे. याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे.
धारूर शहराच्या पश्चिमेस बालाघाट डोंगर रांग आहे. सर्वे नंबर ३७८ मध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय गायरान असून, अनेक शासकीय कार्यालयांना व विभागास यातील जमीन देण्यात आली आहे. यापैकी दोन हेक्टर जमीन राज्य शासनाच्या शिक्षण विभागाला सहा वर्षांपूर्वीर् मॉडेल स्कूलसाठी देण्यात आली होती. मात्र, सदरील योजना काही कारणांमुळे बंद झाल्याने या ठिकाणी सकाळी शहरातील नागरिक फिरण्यासाठी येतात. मात्र, या जमिनीवरील मुरुम उपसा करुन मोठमोठे खड्डे करण्यात येत असून, परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे.
गतकाही वर्षात डोंगर माथ्यावरील मुरुमाचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला आहे. हे उत्खनन थांबून या परिसराचे होणारे विद्रुपीकरण थांबवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.