पाण्याचा बेसुमार उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:35 AM2021-05-11T04:35:43+5:302021-05-11T04:35:43+5:30

शिरूर कासार : गतवर्षी पाऊस भरपूर प्रमाणात झाला होता परिणामी सर्व तलाव तुडुंब भरले होते. मात्र सध्या ...

Excessive abstraction of water | पाण्याचा बेसुमार उपसा

पाण्याचा बेसुमार उपसा

Next

शिरूर कासार : गतवर्षी पाऊस भरपूर प्रमाणात झाला होता परिणामी सर्व तलाव तुडुंब भरले होते. मात्र सध्या शेतीसाठी व सतर वापरासाठी पाण्याचा बेसुमार उपसा चालू असून संभाव्य पाण्याची गरज लक्षात घेता पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची गरज असल्याचे बोलले जाते.

झापेवाडी रस्त्याची दैना कायमच

शिरूर कासार : बीड पाथर्डी रोडपासून झापेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट पडल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी केली जात आहे .

वाढती उष्णता दूध घटीला कारणीभूत

शिरूर कासार : पाऊस भरपूर झाल्याने शेतात यंदा वाळला व ओला चारा मुबलक असला तरी वाढते उष्णतामान हे दूध घटीला कारणीभूत ठरत असल्याचे दूध उत्पादक शेतकरी बोलत आहे .

मंगळवारी ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लस

शिरूर कासार : कोरोना लस पुरवठ्यात सातत्य नसल्याने खंडन पडत आहे ,दोन दिवस लस उपलब्ध नसल्याने काम थांबले होते आता मंगळवारी लस जेष्ठ नागरिकांना देण्यात येणार असून नाव नोंदणी केलेल्या व ऐन वेळेस केंद्रावर आलेल्या नागरिकास लस दिली जाणार आहे ,मात्र शिस्तीचे व नियमांचे पालन करून रांगेत अंतर ठेवत नागरिकांनी लस कार्यक्रमास सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक गवळी व वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर खाडे यांनी केले आहे .

शटर बंद मागचे फाटक उघडे

शिरूर कासार : कडक लाॅकडाऊन अंमलबजावणी सुरू असल्याने औषधी सोडता बाकी सर्व दुकानाचे शटर बंद दिसत असले तरी मागचे फाटक उघडून अडलेले, नडलेल्यांची गरज म्हणून माल दिला जात आहे.

सिंदफणा नदीत डोहातील पाणी हिरवे

शिरूर कासार : पावसाळा संपल्यानंतर साधारण दोन महिने सिंदफणा नदी वाहत होती. मात्र पुढे प्रवाह खंडित झाला. आता तर या डोहातील पाण्याचा रंग देखील हिरवा दिसत असून त्याला दुर्गंधी देखील येत आहे .मोकाट जनावर सुद्धा हे पाणी पित नाही .

कधी सुरू होणार भजन, कीर्तन

शिरूर कासार : तालुक्यातील सर्वच तीर्थक्षेत्राचे व मंदिराचे दरवाजे बंद असून तिथे सुरू असलेले परंपरागत कीर्तन भजन देखील बंद असल्याने भजन कलेला विसर पडू लागल्याने कधी सुरू उघडणार मंदिराचे दरवाजे व कधी सुरू होणार भजन कीर्तन याची प्रतीक्षा वारकरी मंडळाला लागली आहे.

यंदाही आषाढी वारी चुकती काय ?

शिरूर कासार : गतवर्षी कोरोनामुळे आषाढी महामारी आळंदी पंढरपूर पायी पालखी सोहळा ,कार्तिक वारी ,माउलींचा समाधी सोहळा ,तुकाराम बीज ,नाथषष्टी सह नारळी सप्ताह, गावोगावचे सप्ताह आदी धार्मिक कार्यक्रम बंद होते. आजही तीच परिस्थिती कायम असल्याने याही वर्षी आषाढी महामारी व आळंदी पंढरपूर ,देहू पंढरपूर पैठण पंढरपूर या पायी दिंड्या व पालख्या निघणार याबाबत साशंकता निर्माण झाली असून याही वर्षी वारी चुकते की काय असा प्रश्न निष्ठावंत वारकऱ्यांना पडला आहे.

जारच्या पाण्यावर भर

शिरूर कासार : शहरात नगरपंचायतकडून देण्यात येत असलेले पाणी पिण्याचे धाडस कुणीच करत नसल्याने विकत जरी असले तरी जारच्या पाण्यावरच नागरिकांचा भर असल्याचे चित्र दिसून येत आहे .आरोग्यासाठी शुद्ध व थंड पाणी म्हणून सध्या जारचे पाणी मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने जारच्या पाणी विक्रीला चांगले दिवस आले आहे .

Web Title: Excessive abstraction of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.